अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:45 IST2026-04-15T15:23:18+5:302026-04-15T15:45:41+5:30
काळ्या यादीत टाकलेल्या एका इराणी सुपरटँकरने अमेरिकेची नाकेबंदी झुगारून होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. इराणी नौदलाने सांगितले की, ट्रॅकर चालू असलेल्या या टँकरने आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीतून इराणी किनाऱ्यावर सुरक्षितपणे प्रवास केला.

अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
अमेरिकेने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) घातलेली कडक नाकेबंदी मोडीत काढल्याचा मोठा दावा इराणने केला आहे. अमेरिकेने 'काळ्या यादीत' टाकलेले इराणचे एक अतिविशाल कच्च्या तेलाचे जहाज (Supertanker) आपला ट्रॅकर (Tracking System) चालू ठेवून उघडपणे नाकेबंदी ओलांडून इराणी किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले आहे.
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने 'एक्स' वर यासंदर्भात पोस्ट केली आहे. ट्रम्प यांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याची आणि इराणचा सागरी व्यापार रोखल्याची घोषणा केली होती. मात्र, कोणतीही लपवाछपवी न करता इराणने हे जहाज सुरक्षितपणे नेल्याने अमेरिकेच्या नाकेबंदीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सुपरटँकरने आपल्या संपूर्ण प्रवासात आपली ट्रॅकिंग प्रणाली चालू ठेवली होती. त्यामुळे, त्याने अमेरिकेच्या नाकेबंदीला झुगारून कोणत्याही अडथळ्याशिवाय आपल्या गंतव्यस्थानी पोहोचले,असे इराणच्या दूतावासाने सांगितले.
अमेरिकेची नाकेबंदी
यापूर्वी, अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी सुरू केल्याची घोषणा केली होती, यामुळे इराणी बंदरांमधून येणाऱ्या कोणत्याही जहाजांना प्रवेश मिळणार नाही आणि इराणला टोल देणारी कोणतीही जहाजे रोखली जातील.
इराणची अर्थव्यवस्था सुमारे ९० टक्के सागरी आंतरराष्ट्रीय व्यापारावर अवलंबून आहे. नाकेबंदी लागू झाल्यानंतर ३६ तासांच्या आतच, अमेरिकी सैन्याने इराणमधील सागरी मार्गाने होणारा आर्थिक व्यापार पूर्णपणे थांबवला, असेही अमेरिकेने म्हटले आहे.