कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:37 IST2026-04-15T15:36:04+5:302026-04-15T15:37:27+5:30

या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कानात काहीतरी बोलताना दिसत आहेत. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Sometimes Rahul Gandhi, sometimes Kharge, now Siddaramaiah What did Modi say in the ear of the Congress Chief Minister That photo went viral across the country | कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!

कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या एकदिवसीय दौऱ्यावर बेंगळुरूमध्ये दाखल झाले. यानंतर, विमानतळावरील त्यांच्या स्वागताचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कानात काहीतरी बोलताना दिसत आहेत. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्रोटोकॉलनुसार, जेव्हा पंतप्रधान विमानतळावर पोहोचतात, तेव्हा राज्याचा प्रमुख अथवा त्यांचा प्रतिनिधी तेथे उपस्थित असणे आश्यक असते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वतः फुलांचा हार घेऊन पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उभे होते. पारंपारिक टोपी आणि हार घालून मोदींचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान मोदी अचानक सिद्धरामय्या यांच्या जवळ जात त्यांच्या कानात काहीतरी बोलले. नेमका याच क्षणी हा फोटो क्लिक झाला आणि आता नेटकरी या फोटोला विविध कॅप्शन्स देऊन तर्कवितर्क लढवत आहेत.

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा - 
गेल्या एका आठवड्यात पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी संवाद साधताना दिसून आले. सहसा मोदी काँग्रेसवर सडकून टीका करताना दिसतात, मात्र अलीकडेच ते राहुल गांधींशी चर्चा करताना, तर मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी हस्तांदोलन करून विनोद करताना दिसले होते. आता काँग्रेसशासित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबतची ही जवळीक पाहून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

 

Web Title : कर्नाटक के मुख्यमंत्री के कान में मोदी; तस्वीर से राजनीतिक चर्चा शुरू।

Web Summary : कर्नाटक दौरे पर पीएम मोदी की मुख्यमंत्री सिद्धारमैया के साथ बातचीत से अटकलें तेज हो गई हैं। सिद्धारमैया को मोदी के कानाफूसी करते हुए एक तस्वीर प्रसारित हो रही है, जिससे अन्य कांग्रेस नेताओं के साथ हाल ही में हुई बातचीत के बाद राजनीतिक चर्चाएं बढ़ रही हैं।

Web Title : Modi whispers in Karnataka CM's ear; photo sparks political buzz.

Web Summary : PM Modi's interaction with Karnataka CM Siddaramaiah during his visit has ignited speculation. A photo showing Modi whispering to Siddaramaiah is circulating, fueling political discussions after recent interactions with other Congress leaders.