युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:31 IST2026-04-15T14:30:36+5:302026-04-15T14:31:39+5:30

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांकडून एकमेकांविरोधात अत्याधुनिक ड्रोनसह नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यादरम्यान, रशियन सैनिकांनी युक्रेनच्या रोबो आर्मीसमोर आत्मसमर्पण केल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमिर झेलेन्स्की यांनी केला आहे.

Russia-Ukraine War: Ukraine's robot army did its best, captured the post, forcing Russian soldiers to surrender | युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा

युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता चार हून अधिक वर्षे लोटून गेली आहे. एवढी वर्षे लोटली तरी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष काही थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. या युद्धात दोन्ही देशांकडून एकमेकांविरोधात अत्याधुनिक ड्रोनसह नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यादरम्यान, रशियन सैनिकांनी युक्रेनच्या रोबो आर्मीसमोर आत्मसमर्पण केल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमिर झेलेन्स्की यांनी  केला आहे. युक्रेनी सैन्याने रोबोटिक सिस्टिम आणि मानवरहित हवाई वाहनांच्या मदतीने रशियाच्या एका पोस्टवर कब्जा केला, असे झेलेन्स्की यांनी सांगितले आहे. 

या कारवाईबाबत अधिक माहिती देताना झेलेन्स्की यांनी सांगितले की, या युद्धाच्या इतिहासात पहिल्यांदाच शत्रूच्या एका पोस्टवरर पूर्णपणे मानवरहित प्लॅटफॉर्म, ग्राऊंड सिस्टिम आणि ड्रोनच्या माध्यमातून कब्जा केला.

युक्रेनच्या राष्ट्रपतींनी पुढे सांगितले की, कब्जा करणाऱ्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हे अभियान कुठल्याही लष्कराशिवाय तसेच कुठलंही नुकसान होऊ न देता पूर्ण करण्यात आले.

झेलेन्स्की यांनी पुढे सांगितले की, २०२६ सालच्या पहिल्या ३ महिन्यांमध्ये जमिनीवरून युद्ध लढणाऱ्या रोबोटिक प्रणालींनी युक्रेनच्या आघाडीच्या फळीत राहून २२ हजारांहून अधिक मोहिमा काढल्या आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जेव्हा कुठल्याही सैनिकाच्या जागी रोबोटला सर्वात धोकादायक परिसरात पाठवण्यात आल्याने २२ हजारांहून अधिक सैनिकांचे प्राण वाचल आहेत. हे तंत्र मानवी जीविताच्या सुरक्षेचं एक उत्तम उदाहणर आहे, असेही झेलेन्स्की म्हणाले.  

Web Title : यूक्रेन की रोबो सेना ने रूसी चौकी पर कब्ज़ा किया, आत्मसमर्पण करवाया: ज़ेलेंस्की

Web Summary : यूक्रेन का दावा है कि उसकी रोबोटिक प्रणाली ने रूसी चौकी पर कब्ज़ा कर लिया, जिससे बिना किसी नुकसान के आत्मसमर्पण हो गया। ग्राउंड रोबोट द्वारा 22,000 से अधिक मिशनों ने जान बचाई।

Web Title : Ukraine's Robot Army Captures Russian Post, Forces Surrender: Zelenskyy

Web Summary : Ukraine claims its robotic systems captured a Russian post, forcing surrender without casualties. Over 22,000 missions by ground robots saved lives, showcasing the tech's protective role.