Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्तापूर्वीच सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आज मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. 'इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशन'नं (IBJA) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर आज १,५२,९४९ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. सोमवारच्या संध्याकाळच्या तुलनेत सोन्याच्या दरात २,९३८ रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी संध्याकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,०११ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता.
सोन्याचे विविध कॅरेटनुसार ताजे दर
इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनच्या अहवालानुसार, विविध कॅरेट सोन्याचे आजचे दर खालीलप्रमाणे आहेत:
२४ कॅरेट: १,५२,९४९ रुपये प्रति १० ग्रॅम
२३ कॅरेट: १,५२,३३७ रुपये प्रति १० ग्रॅम
२२ कॅरेट: १,४०,१०१ रुपये प्रति १० ग्रॅम
१८ कॅरेट: १,१४,७१२ रुपये प्रति १० ग्रॅम
१४ कॅरेट: ८९,४७५ रुपये प्रति १० ग्रॅम
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
चांदीच्या दरात १३,८७४ रुपयांची प्रचंड उसळी
चांदीच्या किमतीतही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आज चांदीचा भाव २,५०,८५५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सोमवारी संध्याकाळी चांदी २,३६,९८१ रुपये प्रति किलो होती. म्हणजेच सोमवारच्या तुलनेत चांदीच्या दरात तब्बल १३,८७४ रुपयांची वाढ झाली.
गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेपासून सोन्याच्या दरात ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ होण्याचं हे सलग नववं वर्ष आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, यावर्षी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या दरात थोडी घसरण होत आहे. एप्रिल महिन्यात दर तुलनेने स्थिर राहिलेत.
