Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 11:58 IST2026-04-15T11:56:32+5:302026-04-15T11:58:34+5:30

Maharashtra Heatwave Alert: ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कमाल तापमान पुढील एक आठवडा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थितीची शक्यता आहे.

Beware Heat wave-like conditions 42 degrees Celsius recorded in Vidarbha, 38-40 in Marathwada, Madhya Maharashtra and 34-36 degrees Celsius in Konkan | Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद

Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद

मुंबई : उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा विपरीत परिणाम म्हणून पुढील काही दिवस राज्यातील काही भागांना देण्यात आलेला उष्णतेचा इशारा कायम राहणार आहे. मंगळवारी अकोला येथे देशात सर्वाधिक तापमान म्हणून ४४ अंश सेल्सिअसची नोंद झाली असतानाच बुधवारी देखील विदर्भ आणि राज्यातील अनेक भागात कमाल तापमान चाळीस अंशांवर नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मुंबई महानगर प्रदेशात देखील उष्णता अधिक राहील, असे देखील हवामान अभ्यासाकांकडून सांगण्यात आले.

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कमाल तापमान पुढील एक आठवडा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थितीची शक्यता आहे.

विदर्भात (४२+), मराठवाडा, मध्य महाराष्ट्र (३८-४०), कोकण प्रदेशात उष्ण दमट (३४-३६) तापमान राहील. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे विशेषतः एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात कमाल तापमान सरासरी होते. परंतु आता उष्णतेमध्ये वाढ झाल्याने तापमान अधिक वाढल्याने नागरिकांना मोठ्या कमाल तापमानाचा सामना करावा लागत आहे.

हवामान अभ्यासाक अथ्रेय शेट्टी यांच्याकडील माहिती नुसार, मुंबई महानगर प्रदेशात शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटे सदृश्य स्थिती राहील. मुंबईचे कमाल तापमान ३५ आणि ३६ अंशांच्या आसपास नोंदविले जात असून हवामानातील बदलामुळे मुंबईकरांना अधिक अधिक ताप सहन करावा लागेल.

Web Title : लू का अलर्ट: महाराष्ट्र में प्रचंड गर्मी, विदर्भ में 42 डिग्री सेल्सियस

Web Summary : महाराष्ट्र में लू का अलर्ट जारी है, विदर्भ में तापमान 42 डिग्री सेल्सियस से ऊपर। मराठवाड़ा, मध्य महाराष्ट्र और कोंकण में भी गर्मी बढ़ेगी। मुंबई में शुक्रवार तक लू जैसे हालात रहेंगे, तापमान 36 डिग्री सेल्सियस के आसपास रहने की संभावना है।

Web Title : Heatwave Alert: Maharashtra Braces for Scorching Temperatures; Vidarbha at 42°C

Web Summary : Maharashtra faces a heatwave, with Vidarbha exceeding 42°C. Marathwada, central Maharashtra, and Konkan will experience elevated temperatures. Mumbai anticipates a similar heatwave until Friday, with temperatures around 36°C, prompting citizens to brace for intense heat.