भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 11:43 IST2026-04-15T11:42:22+5:302026-04-15T11:43:25+5:30

पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली एक बस अचानक अनियंत्रित होऊन उलटली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २५ जण जखमी झाले आहेत.

fatehgarh sahib bus accident anandpur sahib devotees death injured | भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी

भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी

पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली एक बस अचानक अनियंत्रित होऊन उलटली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे ३५ ते ४० भाविक होते. हे सर्वजण आनंदपूर साहिब येथे दर्शन घेऊन आपल्या 'मेन माजरी' गावाकडे परतत होते. याच दरम्यान, बस्सी पठाणाजवळ ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हा अपघात अत्यंत भीषण होता. एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं की, "अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला, तो ऐकून मी घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे बस उलटलेली होती आणि प्रवासी मदतीसाठी आक्रोश करत होते." परिसरातील ग्रामस्थांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बसबाहेर काढण्यास मदत केली.

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, अपघातानंतर घटनास्थळी त्वरित रुग्णवाहिका पोहोचू शकल्या नाहीत. सुरुवातीला फक्त एकच रुग्णवाहिका आल्याने अनेक जखमींना खासगी वाहनांतून रुग्णालयात नेण्यात आलं. यामुळे मदतकार्यात काहीसा विलंब झाला असला तरी, स्थानिक लोकांच्या तत्परतेमुळे अनेकांचा जीव वाचला.

बसचा टायर फुटल्याने झाला अपघात

अपघातात जखमी झालेल्या एका महिलेने सांगितलं की, अचानक बसचा एक टायर फुटला, ज्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं. बस एका बाजूला झुकली आणि रस्त्याशेजारील एका खांबाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की बसमधील प्रवासी सीटवरून उडून खाली पडले.

या घटनेबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे. फतेहगड साहिबचे एसएसपी शुभम अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री ९:३० ते १० च्या सुमारास झाला. प्राथमिक तपासात बसच्या तांत्रिक बिघाडामुळे वाहन अनियंत्रित झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

त्यांनी पुढे सांगितलं की, पोलीस आणि बचाव पथकाने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. सुमारे १५ जखमींना मोरिंडा रुग्णालयात आणि ९ जणांना फतेहगड साहिब येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
 

Web Title : पंजाब में भीषण बस दुर्घटना: छह की मौत, पच्चीस घायल

Web Summary : फतेहगढ़ साहिब, पंजाब में एक बस दुर्घटना में छह श्रद्धालुओं की मौत हो गई और पच्चीस घायल हो गए। आनंदपुर साहिब से लौट रही तीर्थयात्रियों से भरी बस बस्सी पठाना के पास पलट गई। शुरुआती रिपोर्टों में तकनीकी खराबी के कारण दुर्घटना होने का संकेत दिया गया है। घायल व्यक्तियों का पास के अस्पतालों में इलाज चल रहा है।

Web Title : Fatal Bus Accident in Punjab: Six Dead, Twenty-Five Injured

Web Summary : A bus accident in Fatehgarh Sahib, Punjab, killed six devotees and injured twenty-five. The bus, carrying pilgrims returning from Anandpur Sahib, overturned near Bassi Pathana. Initial reports suggest a technical fault caused the accident. Injured individuals are receiving treatment in nearby hospitals.