अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:35 IST2026-04-15T12:31:13+5:302026-04-15T12:35:52+5:30
अशोक प्रकरण खरात गाजत असताना अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून एक धक्कादायक आणि संतापजनक 'व्हिडीओकांड' समोर आले आहे. एका १९ वर्षीय तरुणाने अनेक तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओ व अनेक आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून एक संतापजनक 'व्हिडीओकांड' समोर आले आहे. एका १९ वर्षीय तरुणाने अनेक तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओ व अनेक आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. दरम्यान, आता आरोपी अयान याच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
आरोपी अयान याच्या घरावर नगरपालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. अयान याचे घर दोन मजल्याचे आहे. दुसऱ्या मजल्याची परवानगी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला असून आता नगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी याबाबत आरोप केले आहेत. दरम्यान, आता नगरपालिकेने अतिक्रमण पूर्ण हटवले आहे. आता अयान याच्या घरावर दुसऱ्या मजल्याबाबत नोटीस लावली आहे. या नोटीसीची वेळ संपल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरही बुलडोझर कारवाई करण्यात येणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
परतवाडा येथील अयान अहमद तनवीर अहमद (वय १९) याने अनेक मुलींशी जवळीक साधून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो काढले होते. हे व्हिडीओ अयानचा मित्र उजेर खान इकबाल खान (२०) याने सोशल मीडियावर व्हायरल केले. गेल्या तीन दिवसांपासून हे व्हिडीओ वणव्यासारखे पसरल्याने दहशतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांचे आवाहन
खासदार अनिल बोंडे यांनीही याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली होती. 'पीडितांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी घाबरून न जाता महिला पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तुमची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल,' असे आवाहन एस. पी. विशाल आनंद यांनी केले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली आहेत.
आरोपींचे मोबाईल जप्त केले असून सर्व पुरावे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येत आहेत. सोशल मीडियावरून हे व्हिडिओ हटवण्यासाठी संबंधित कंपन्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पीडितांच्या कुटुंबीयांनी न घाबरता महिला अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल.
विशाल आनंद, पोलिस अधीक्षक