CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! 100 तासांत तब्बल 10 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:16 AM2020-07-18T10:16:46+5:302020-07-18T10:34:43+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल एक कोटीच्या वर गेली आहे. तर जवळपास सहा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अकराव्या, नवव्या व नंतर चौथ्या स्थानी असलेला भारत आता तिसऱ्या स्थानी आला आहे. जगभरात कोरोनाचा विस्फोट झालेला पाहायला मिळत आहे.

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे.

अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच कोरोनापुढे मोठे देशही हतबल झाले आहेत.

जगभरात तब्बल 14,194,140 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 599,416 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 8,470,275 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

जगातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.

रॉयटर्स टॅलीने दिलेल्या माहितीनुसार, फक्त 100 दिवसांत कोरोनाचे तब्बल एक मिलियन म्हणजेच दहा लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. या धक्कादायक आकडेवारीने नवा रेकॉर्ड केला आहे.

जानेवारी महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला त्यानंतर पुढच्या तीन महिन्यांत कोरोनाग्रस्तांची संख्या ही दहा लाखांपर्यंत पोहचली. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत कोरोनाचा धोका वाढला आहे.

महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा 35 लाखांहून अधिक झाला आहे.

कोरोनामुळे अनेक देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाने परिस्थिती भीषण होत असल्याचं म्हटलं आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.

कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. ते शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी चाचण्या केल्या जात आहेत.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जगभरात अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. अमेरिका, ब्राझील, भारत आणि दक्षिण अफ्रिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे.

भारतातही कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचे एकूण 10,38,716 रुग्ण आहेत.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 34,884 नवे रुग्ण आढळून आले असून 671 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 26,273 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

Read in English