Coronavirus : कोणत्या वस्तूंमध्ये किती दिवस जिवंत राहतो कोरोना व्हायरस?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 02:30 PM2020-03-17T14:30:45+5:302020-03-17T14:46:36+5:30

Coronavirus: कोरोना व्हायरसचं थैमान भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातही याचे रूग्ण वाढत आहेत. अशात लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तसेच लोकांच्या मनात अनेक प्रश्नेही आहेत. काही लोकांना असेही प्रश्न पडत आहेत की, ते ज्या वस्तू वापरतात त्यात कोरोना किती दिवस जिवंत राहतो? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर....

कसा पसरतो कोरोना व्हायरस? - सामान्यपणे कोरोना व्हायरस एका संक्रमित व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. त्यासोबतच मोकळ्या हवेत खोकल्याने किंवा शिंकल्याने, संक्रमित व्यक्तीसोबत हात मिळवल्याने किंवा त्यांना गळाभेट घेतल्याने तसेच त्यांनी वापरलेल्या वस्तूंना स्पर्श केल्याने हा व्हायरस परसतो.

प्लास्टिक आणि स्टीलमध्ये किती दिवस राहतो? - कोरोना व्हायरस प्लास्टिक आणि स्टीलसारख्या वस्तूंवर तीन दिवस जिवंत राहू शकतो असे सांगितले जाते. म्हणजेच संक्रमित व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंना तीन दिवसात कुणी स्पर्श केला तर त्यांनाही याची लागण होऊ शकते.

लाकूड आणि काचावर किती दिवस राहतो कोरोना? - कोरोना व्हायरस २० डिग्री सेल्सिअसच्या तापमानावर स्टीलवर दोन दिवस, लाकडावर आणि काचावर चार दिवस, मेटलवर म्हणजे धातुर पाच दिवसांपर्यतं, प्लास्टिक आणि चीनी मातीच्या वस्तूंवर पाच दिवसांपर्यंत राहतात.

थंड रूममध्ये किती दिवस राहतो? - वैज्ञानिकांना असंही आढळून आलं की, हा व्हायरस एका थंड रूममध्ये प्लास्टिकच्या वस्तूंवर नऊ दिवसांपर्यंत राहू शकतो. हा व्हायरस अॅल्यूमिनिअमवर दोन तास आणि लेटेक्सवर आठ तासांपेक्षा कमी राहतो.

नोटा, केस आणि कपड्यातून पसरतो का व्हायरस? - वैज्ञानिकांना असं आढळून आलं की, नोटा, केस आणि कपडे अशा हवा पास होणाऱ्या वस्तूंवर कोरोना व्हायरस जास्त काळ जिवंत राहत नाही.

शरीरात कसा शिरतो व्हायरस? - वैज्ञानिकांना असे आढळले की, संक्रमित जागांना स्पर्श केल्यावर जर व्यक्तीने चेहऱ्याला, डोळ्यांना आणि नाकाला स्पर्श केला तर व्हायरस व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो आणि फुप्फुसात शिरतो. एकदा जर हा व्हायरस फुप्फुसात पोहोचला तर तो संपूर्ण शरीरात पसरतो.

कोरोना व्हायरसमुळे लहान मुले संक्रमित होतात का? - ही एक अफवा आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती कोरोना व्हायरसमुळे संक्रमित होऊ शकतो. वयस्क आणि ज्यांना आधीच आजार आहे, त्यांना संक्रमणाचा अधिक धोका असतो, तसेच ज्यांना मधुमेह, हृदयाचा आजार, गंभीर अस्थमा, सीओपीडी असेल तरसेच दीर्घकाळापासून औषधोपचार घेत असतील, त्यांना धोका अधिक असतो.

घरगुती उपचारामुळे कोरोनाचे संक्रमण बरे होते काय? - लसूण, गरम पाण्याने गुळणी करणे, व्हिटॅमिन सी, स्टेरॉईड घेणे असा सल्ला सोशल मीडियावर देण्यात येत आहेत. हा सल्ला काही आजारांसाठी महत्त्वाचा आहे. परंतु कोरोना व्हायरससाठी हा सल्ला योग्य नाही. नागरिकांनी शरीरावर तिळाचे तेल, क्लोरीन किवा अल्कोहोलचा स्प्रे मारणे सुरू केले आहे. मात्र, त्यामुळे दिलासा मिळत नाही. ब्लीचसह ७५ टक्के इथेनॉल पॅरासिटीक अ‍ॅसिड आणि क्लोरोफार्मसारखे काही किटाणुनाशक आहेत, जे कोरोना व्हायरस नष्ट करू शकतात, परंतु कोणतेही किटाणुनाशक पिणे योग्य नाही. ते धोक्याचे ठरू शकते.

तापमानामुळे व्हायरस नष्ट होतो का? - जागतिक आरोग्य संघटनेनुसार हँड ड्रायरने व्हायरस नष्ट होत नाही. अल्ट्रा व्हायलेट किरणेही योग्य नाहीत. ते त्वचेला इजा पोहोचवू शकतात. याची पुष्टी करण्याची कोणतीच पद्धत नाही. उन्हाळ्यात तापमान वाढल्यास व्हायरस नष्ट होतो.

मास्कमुळे आपले रक्षण होऊ शकते का? - एन ९५ प्रकारच्या काही मास्कमुळे आपले रक्षण होऊ शकते. तोंड आणि नाक झाकण्यासाठी आपण दुपट्टा किंवा रुमालाचा मास्कसारखा उपयोग करीत असाल, तर आजाराला आपण रोखू शकणार नाही. प्रत्येक वेळी नाकावर आणि तोंंडावर मास्क चढवून ठेवल्याने संक्रमणाचा धोका वाढतो.