Corona virus: एसीमध्ये खरंच इन्फेक्शनची जास्त भीती?; जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 10:56 AM2020-03-18T10:56:18+5:302020-03-18T11:15:11+5:30

Corona Virus : एसी कूलिंगमुळे घरातील किंवा ऑफिसमधील तापमान पुन्हा कमी होतं. याने घरातील व्हायरस पुन्हा अॅक्टिव होतात.

कोरोना व्हायरसने जगभरातील 1.84 लाखांपेक्षा अधिक लोकांना आपल्या जाळ्यात घेतलं आहे. यातील 7 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. दरम्यान 80 हजार लोकांना ठिक करून घरी पाठवण्यात आलंय. पण अजूनही कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

यावर तज्ज्ञांचं असं मत आहे की, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येण्यासोबतच एअर कंडीशनर म्हणजे AC मुळेही हा व्हायरस पसरू शकतो.

तज्ज्ञांच्या या सूचनेनंतर सिंगापूरमध्ये प्रशासनाने लोकांना आवाहन केलं आहे की, या व्हायरसपासून बचाव करायचा असेल तर एसी बंद ठेवा आणि ताज्या हवेसाठी फॅनचा वापर करा. तसेच भारतीय रेल्वेने एसी कोचसाठीही काही अटी ठरवल्या आहेत.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले होते की, उष्णता वाढल्यावर कोरोना व्हायरस नष्ट होण्याचा कोणताही पुरावा अजून मिळाला नाही. सोबतच भारतात जसजशी गरमी वाढते लोक एअर कंडीशनरचा वापर अधिक करतात.

एसी कूलिंगमुळे घरातील किंवा ऑफिसमधील तापमान पुन्हा कमी होतं. याने घरातील व्हायरस पुन्हा अॅक्टिव होतात. हेच कारण आहे की, त्यांना वाढण्यास, जिवंत राहण्यास असं वातावरण मिळतं. कारण जेव्हा एसी सुरू केला जातो तेव्हा व्हेंटिलेशनचे सगळे मार्ग आपण बंद करतो. याने आतील तापमान कमी होतं.

चीनच्या डॉक्टरांनी बऱ्या झालेल्या रूग्णांना घरी जाऊनही वेगळं राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी लोकांना घरातील एक अशी रूम आयसोलेशन रूम करण्याचा सल्ला दिलाय ज्यात प्रकाश आणि हवा येण्याची व्यवस्था असेल.

स्पॅनिश फ्लू पसरला असताना संक्रमित लोकांना सन बाथ आणि मोकळ्या हवेत राहण्याचा सल्ला दिला होता. तज्ज्ञ सांगतात की, जास्त थंड ठिकाणी कोरोना व्हायरस सहजपणे विकसित होतो आणि वाढतो.

तसेच तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पसरू शकतो. ज्या घरांमध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्था नाही, अशी घरे कोरोना व्हायरसला वाढण्यासाठी सर्वात अनुकूल ठिकाण आहेत.

ज्या बिल्डींगमध्ये जेवढे जास्त एसी लावले जातील, जेवढा जास्त वेळ लावले जातील कोरोनाला वाढण्यासाठी तेवढी जास्त मदत होईल. आता तर उष्णता वाढल्यावर स्थिती आणखीनच गंभीर होऊ शकते.

सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्वायर्नमेंटच्या आकलनानुसार, दिल्लीमध्ये गरमी वाढण्यासोबत विजेचा वापरही अधिक होत आहे. एकीकडे एसीचा गारवा तुम्हाला उष्णतेपासून वाचवतो तर दुसरीकडे कोरोना व्हायरसला वाढण्यास मदतही करतो.

भारतातील जास्तीत जास्त घरांमध्ये व्हेंटिलेशनची थोडीफार व्यवस्था असते. पण जेव्हा एसी लावल्यावर दारं-खिडक्या बंद करतो तेव्हा हवा येणे बंद होते. सोबत प्रदूषणाचे बारीक कणही घरातील किंवा ऑफिसमधील हवेत असतात. अशा वातावरणात कोरोना व्हायरस सहजपणे पसरू शकतो.