प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 16:19 IST2026-05-01T16:18:51+5:302026-05-01T16:19:59+5:30

प्रेमात वेडा झालेला माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण बिहारच्या रोहतास जिल्ह्यातून समोर आले आहे.

Girlfriend rejected him, young man with her photo and tattoo on T-shirt climbs onto electric pole and... | प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...

AI Generated Image

प्रेमात वेडा झालेला माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण बिहारच्या रोहतास जिल्ह्यातून समोर आले आहे. इंदूरहून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या प्रेयसीला मनवण्यासाठी आलेल्या एका तरुणाने, तिने भेटण्यास नकार दिल्यानंतर थेट विजेच्या खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. या हायव्होल्टेज ड्राम्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

नेमकं प्रकरण काय?

प्रशांत जैन हा तरुण मध्य प्रदेशातील इंदूर येथील उस्मान नगरचा रहिवासी आहे. त्याचे बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील मकराईन गावातील एका तरुणीवर प्रेम होते. गेल्या काही दिवसांपासून या तरुणीने प्रशांतसोबत बोलणे बंद करून त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते. आपल्या प्रेयसीला पुन्हा मनवण्यासाठी आणि तिला परत मिळवण्यासाठी प्रशांत थेट इंदूरहून बिहारमध्ये पोहोचला. मात्र, तिथे गेल्यावरही तरुणीने त्याच्याशी बोलण्यास किंवा त्याला भेटण्यास स्पष्ट नकार दिला.

टी-शर्टवर फोटो आणि अंगावर टॅटू

प्रशांतच्या वेडेपणा पाहून गावकरीही चक्रावून गेले. त्याने आपल्या टी-शर्टवर प्रेयसीचा फोटो छापून घेतला होता, तर हातावर तिच्या नावाचा टॅटूही गोंदवला होता. प्रेयसीने ठामपणे नकार दिल्यानंतर प्रशांत पूर्णपणे कोलमडून गेला. याच नैराश्यातून तो भर वस्तीत असलेल्या विजेच्या खांबावर चढला आणि स्वतःच्या कमरेच्या बेल्टने गळफास घेण्याचा प्रयत्न करू लागला.

गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

गावात हा प्रकार पाहताच मोठी गर्दी जमली. लोकांनी त्याला खाली उतरण्याची विनवणी केली, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर गावकऱ्यांनी मोठ्या शिताफीने आणि धाडसाने प्रशांतला सुरक्षितरीत्या खाली उतरवले. प्रशांतची प्रकृती खालावल्याने त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, तिथून त्याला सासारामच्या सदर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title : प्रेमिका ने ठुकराया, टैटू बनवा प्रेमी बिजली के खंभे पर चढ़ा

Web Summary : प्रेमिका से जुनून में एक युवक इंदौर से बिहार पहुंचा। इनकार मिलने पर वह बिजली के खंभे पर चढ़ गया। उसने टी-शर्ट पर प्रेमिका की तस्वीर और हाथ पर नाम का टैटू बनवाया था। ग्रामीणों ने उसे बचाया, फिलहाल अस्पताल में भर्ती है।

Web Title : Rejected Lover Climbs Electric Pole After Tattoo, Photo Fiasco

Web Summary : Obsessed with his lover, a youth traveled from Indore to Bihar. He climbed an electric pole after she refused him. He had her picture on his t-shirt and a tattoo of her name on his arm. Villagers rescued him, and he is now hospitalized.