कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:13 IST2026-04-24T11:09:24+5:302026-04-24T11:13:51+5:30

Tiffin Box Packing Tips : सकाळी डब्यामध्ये भरून दिलेले गरमागरम अन्नपदार्थ दुपारी जेवणाची वेळ होईपर्यंत खराब होतात. अशा परिस्थितीत तुम्हीही उन्हाळ्याचा दिवसांत डब्यातील अन्नपदार्थ खराब होण्याच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर काही स्मार्ट ट्रिक्स आणि योग्य पॅकिंग स्टाईलच्या मदतीने तुम्ही तुमचा टिफिन संध्याकाळपर्यंत फ्रेश आणि हेल्दी ठेवू शकता. त्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून वातावणातील उष्मा कमालीचा वाढला आहे. या वाढत्या उकाड्यामुळे जीवाची लाही लाही होत असल्याने प्रत्येकजण त्रस्त आहे. सोबतच उन्हाळ्याच्या दिवसात अन्नपदार्थ खराब होण्यापासून वाचवण्याचं आव्हान गृहिणींसमोर उभं राहिलेलं आहे. उन्हाळ्यात गरमीमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. त्यात लंच बॉक्समधील अन्नपदार्थ तर आणखीनच लवकर खराब होतात.

सकाळी डब्यामध्ये भरून दिलेले गरमागरम अन्नपदार्थ दुपारी जेवणाची वेळ होईपर्यंत खराब होतात. बंद टिफिनमध्ये असलेली आर्द्रता आणि बाहेरील उकाडा यांच्या संगमामुळे बॅक्टेरिया तयार होण्यात अनुकूल परिस्थिती तयार होते. अशा परिस्थितीत तुम्हीही उन्हाळ्याचा दिवसांत डब्यातील अन्नपदार्थ खराब होण्याच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर काही स्मार्ट ट्रिक्स आणि योग्य पॅकिंग स्टाईलच्या मदतीने तुम्ही तुमचा टिफिन संध्याकाळपर्यंत फ्रेश आणि हेल्दी ठेवू शकता. त्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसांत लंच बॉक्स पॅक करताना त्यात काय ठेवायचं आणि काय ठेवू नये याची योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अन्नपदार्थांची निवड महत्त्वाची असते. उन्हाळ्याच्या दिवसांत कमी आर्द्रता असलेले अन्नपदार्थ टिफिनमध्ये पॅक करणं योग्य ठरतं. यामध्ये सुक्या भाज्या, भाकरी, पराठा, पुलाव किंवा पोहे यासारख्या पदार्थांचा समावेश आहे. तर अधिक ग्रेव्ही असलेल्या भाज्या, क्रीम, मेयोनीज किंवा डेअरीमधील पदार्थ लवकर खराब होतात.

बऱ्याचदा लोक घाईगडबडीत गरमागरम अन्नपदार्थ टिफिनमध्ये पॅक करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. गरम अन्नपदार्थामुळे वाफ तयार होते. तसेच डब्यामध्ये आर्द्रता वाढते. त्यामुळे अन्न लवकर खराब होते. त्यामुळे अन्नपदार्थ थोडे थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये ठेवले पाहिजेत.

ज्या प्रकारे उन्हाळ्याच्या दिवसात लंच बॉक्समध्ये पॅक करण्यासाठी योग्य अन्नपदार्थांची निवड करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ज्या टिफिनमध्ये अन्नपदार्थ पॅक करायचे आहेत. त्याची निवडही योग्य प्रकारे करणे आवश्यक असते. कारण अन्नपदार्थ ताजे ठेवण्यामध्ये लंच बॉक्स हा महत्त्वाची भूमिका बजावतो. एअर टाईट आणि स्टीलचे डबे उन्हाळ्याच्या दिवसांत अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी अधिक उपयुक्त असतात. जर सुके आणि ओले असे दोन्ही प्रकारचे अन्नपदार्थ असतील तर ते वेगवेगळ्या डब्यात भरले पाहिजेत. त्यामुळे त्यांची चव बिघडत नाही.

- उन्हाळ्यात अन्नपदार्थ खराब होऊ नयेत यासाठी त्यात तुम्ही थोडं लिंबू टाकू शकता. लिंबू नैसर्गिक संवर्धकाप्रमाणे काम करतं.- तसेच टिफिन बॉक्स हा नेहमी इन्सुलेटेट बॅकमध्ये ठेवा - टिफिन हा थेट उन्हाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. टिफिन आईस पॅक किंवा थंड पाण्याच्या बाटलीसोबत ठेवू शकता.

टॅग्स :अन्नfood