अवघ्या ३० वर्षांच्या दिव्यांकाची मनाला चटका लावून जाणारी 'एक्झिट'; काय होती शेवटची पोस्ट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 08:59 IST2026-04-23T08:45:42+5:302026-04-23T08:59:31+5:30
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. दिव्यांकाच्या अकाली जाण्याने तिचे चाहते आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान दिव्याची शेवटची पोस्ट पाहून सर्वांना धक्का बसला आहे.

दिव्यांका सिरोही कृष्णाची मोठी भक्त होती. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर तिने भगवान श्रीकृष्ण आणि महादेवाशी संबंधित अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.

दिव्यांकाने १९ मार्च २०२६ रोजी शेवटची पोस्ट केली होती. यात ती अत्यंत आनंदी दिसत आहे. कायम खूश असणाऱ्या दिव्यांकाचं असं निधन सर्वांना चटका लावून गेलं.

दिव्यांका सिरोहीच्या शेवटच्या पोस्टमध्ये ती कृष्णभक्तीत तल्लीन झालेली दिसली. याशिवाय तिने बॅकग्राऊंडला बी प्राकचं गाणं लावून ती स्वतःभोवती फेर धरुन डान्स करताना दिसते.

दिव्यांकाने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने दिव्यांकाचे निधन झाले असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

फार कमी वयात दिव्यांकाचं निधन झाल्याने मनोरंजन विश्वातून आणि दिव्यांकाच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी सकाळी तिच्या मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिव्यांका हरियाणवी मनोरंंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या रिल आणि फोटोंना चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रेम मिळायचं. दिव्यांकाच्या जाण्याने मनोरंजन विश्वातील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.