Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 16:12 IST2026-05-09T16:02:51+5:302026-05-09T16:12:07+5:30

Happy Mother's Day 2026 Wishes in Marathi: आईच्या निस्वार्थ मायेचा आणि त्यागाचा सन्मान करणारा हा सुंदर शुभेच्छा संदेशांचा संग्रह तुमच्यासाठी खास तयार केला आहे. हे प्रेमळ फोटो तुमच्या आईला पाठवून तिचा दिवस खास बनवा आणि आपल्या मित्र-परिवारासह सोशल मीडियावर नक्की शेअर करा. चला, या मातृदिनी आपल्या 'आई' या जगातील सर्वात सुंदर व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करूया!

आईकडे काम असेल तर आईला सांगावं लागतं… वडिलांकडे काम असेल तरीही आईलाच सांगावं लागतं… म्हणून तर ती आपली पहिली गुरु, मैत्रीण, सर्वस्व असते, जिच्याकडून प्रत्येक दान पदरात मिळतं! जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

घर सुटलं पण आठवण कधीच सुटत नाही, जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही! जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोठेही न मागता भरभरुन मिळालेलं दान… विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई! जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ह्या आयुष्यात सर्व काही बदलेल, पण आईचे प्रेम नाही! जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एकदा मी विचारलं आई आयुष्य म्हणजे काय गं ? आई ने हसून उत्तर दिले…… जिथे आपल्या अपेक्षा बाजूला सारून, दुसऱ्याच्या आनंदासाठी जगावे लागते, तेच आपलं आयुष्य! जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या पहिल्या श्वासापासून, तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई…! जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगात मृत्यू ला अनेक मार्ग आहेत… पण जन्मास फक्त एकच…आई! मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आपल्या सुखासाठी सारं काही करत असते कशाचीच भिती नसते जेव्हा आई सोबत असते! जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!