मोबाइल रिचार्जवर 75GB पर्यंत अतिरिक्त डेटा आणि हॉटस्टार, ऑफरचा आज अखेरचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 11:26 AM2022-10-06T11:26:33+5:302022-10-06T11:35:09+5:30

पाहा आणखी कोणते मिळतायत बेनिफिट्स.

दूरसंचार कंपनी Vodafone-Idea (Vi) आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या कालावधीत भन्नाट ऑफर्स देत आहे. या ऑफर अंतर्गत यूजर्सना 75 GB पर्यंत अतिरिक्त डेटा मिळेल. ही ऑफर वोडाफोन-आयडियाच्या 1449 आणि 3099 रुपयांच्या प्लॅनसह दिली जात आहे. या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांपर्यंत आहे.

या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 2GB डेटासह Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. ऑफरची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर आहे. या प्लॅनमध्ये कंपनी कोणते फायदे देत आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

1499 रूपयांचा Vodafone-Idea चा प्लॅन 180 दिवसांच्या वैधतेसह येतो. इंटरनेट वापरण्यासाठी या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. ऑफर अंतर्गत, कंपनी या प्लॅनमध्ये 50 GB अतिरिक्त डेटा देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील. हा प्लॅन अनेक प्रकारच्या बेनिफिट्ससह येतो. यामध्ये कंपनी Binge ऑल नाईट बेनिफिट देत आहे.

Binge All Night मध्ये, तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित डेटा मिळतो. यासोबतच कंपनी या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि 2GB पर्यंत डेटा डिलाईट ऑफर करत आहे. प्हा प्लॅन वापरणाऱ्या युझर्सना Vi Movies आणि TV VIP चा मोफत ॲक्सेसदेखील मिळेल.

365 दिवसांची वैधता असलेल्या 3099 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मिळेल. सध्या सुरू असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला या प्लॅनसह 75 GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल. या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग दिले जात आहे.

दररोज 100 मोफत एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी एका वर्षासाठी Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले अतिरिक्त फायदे 1449 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच दिले जाणार आहेत.