लांब आणि दाट पापण्यांसाठी 'हे' 6 उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 01:56 PM2019-01-02T13:56:17+5:302019-01-02T14:10:42+5:30

आपला चेहरा हिच आपली खरी ओळख असते असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. चेहऱ्याच्या सौंदर्यामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वामध्ये भर पडते. त्यातल्या त्यात चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये डोळ्यांची फार मोठी भूमिका असते. आपलं सौंदर्य जपण्यासाठी नेहमीच महिलांचे निरनिराळे प्रयत्न सुरू असतात. त्यातल्या त्यात डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यात डोळ्यांच्या पापण्यांचं मोठे योगदान असते. परंतु जर तुमच्या पापण्या दाट नसतील तर, त्यासाठी महागड्या ट्रिटमेंट घेण्याऐवजी काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या पापण्या दाट बनवू शकता.

दररोज काजळ, मस्करा किंवा डोळ्यांवर लावण्यात येणारे कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. त्यामुळे पापण्यांच्या केसांवर वाईट प्रभाव पडतो. या कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्समध्ये अस्तित्वात असणाऱ्या केमिकल्समुळे अनेकदा पापण्यांचे केस गळून जातात. वेळीच काळजी घेतली नाही तर, डोळ्याजवळच्या त्वचेलाही नुकसान पोहचू लागते. पापण्याच्या केसांची वाढ खुंटते. त्यामुळे पापण्या फार विरळ दिसू लागतात. त्यामुळे पापण्यांची वेळीच काळजी घेणं गरजेचं असतं.

कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांवर लावल्यामुळे पापण्या दाट होण्यास मदत होते. एका कॉटन बॉलच्या मदतीने हे तेल हलक्या हाताने पापण्यांवर लावा. पापण्यांच्या आजूबाजूला असलेल्या त्वचेवरही लावा. एक मिनिटासाठी तसचं ठेवा आणि त्यांनंतर हाताच्या बोटांनी मसाज करा. रात्रभर तसचं ठेवा. याव्यतिरिक्त एरंडेल तेलाचा वापर पापण्यांऐवजी आयब्रोवर केल्यानेही आयब्रो दाट आणि सुंदर होण्यास मदत होईल.

जर तुम्ही ग्रीन टी पिण्याचे शौकीन असाल तर हाच ग्रीन टी तुमच्या पापण्या दाट करण्यासाठीही मदत करेल. ज्यावेळी तुम्ही पिण्यासाठी ग्रीन टी तयार कराल त्यावेळी त्यातील दोन चमचे ग्रीन टी बाजूला काढून ठेवा. थंड झाल्यानंतर ही ग्रीन टी कॉटन बॉलमध्ये बुडवून डोळ्यांवर लावा. लक्षात ठेवा की, डोळ्यांमध्ये जावू देऊ नका फक्त पापण्यांच्या केसांवरच लावा. ग्रीन टीमध्ये अस्तित्वात असणारे अॅन्टीऑक्सिडंट तत्व पापण्यांसोबतच तेथील त्वचेसाठाही परिणामकारक ठरते.

ऑलिव्ह ऑइल केसांच्या वाढिसाठी मदत करतं. कापसाच्या मदतीने ऑलिव्ह ऑइल पापण्यांवर लावा. त्यानंतर पापण्या आणि आजूबाजूच्या त्वचेवर हाताच्या बोटांनी 2 मिनिटांसाठी मसाज करा. यामुळे मृत पेशी निघून जाऊन पापण्यांच्या केसांची वाढ होण्यास मदत होईल.

पेट्रोलियम जेली आपल्या घरात असतेच. बोटांच्या मदतीने थोडीशी पेट्रोलियम जेली पापण्यांवर लावा. पापण्यांवर ही लावल्यानंतर झोपून जा किंवा काही वेळाने कापसाच्या मदतीने स्वच्छ करून घ्या.

बाजारात सहज आणि अगदी कमी दरामध्ये या कॅप्सूल उपलब्ध होतात. या कॅप्सूल थोड्या फोडून त्यामधील औषध पापण्यांवर लावल्याने पापण्या दाट होण्यास मदत होते. केसांची वाढ होण्यासाठी व्हिटॅमिन ई फायदेशीर असते. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन ईचा वापर आयब्रो आणि केसांवर करणंही फायदेशीर ठरतं.

डोळ्यांच्या आयलिड्समुळेच पापण्यांच्या केसांची वाढ होते. येथील ब्लड फ्लो जर सुरळीत असेल तर पापण्यांची वाढ होण्यास मदत होईल. दोन्ही डोळ्यांना आय लिडवर मसाज केल्याने रक्त प्रवाह वाढविण्यास मदत होईल. आठवड्यातून 2 ते 3 वेळा असं केल्यानं फायदा होईल.