केवळ ९९९ रूपये देऊन घरी घेऊन जा Yamaha च्या स्कूटर्स; मिळतोय बंपर डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:45 PM2021-08-16T18:45:30+5:302021-08-16T18:51:46+5:30

Yamaha Scooters : तुम्ही स्कूटर विकत घेण्याच्या विचारात असाल तर सध्या तुमच्याकडे आहे उत्तम संधी. यामाहाच्या स्कूटर्स केवळ 999 रूपयांत घरी नेता येणार.

कमी किंमत, उत्तम मायलेज, लूक अशा स्कूटर्सची मागणी कायमच सर्वाधिक असते. जक तुम्ही कमी खर्चात सध्या स्कूटर घरी नेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

Yamaha Motors India नं ऑगस्ट महिन्यात आपल्या स्कूटर्सच्या रेंजवर बंपर डिस्काऊंट देण्याची घोषणा केलीआहे. यामध्ये यामाहा फॅसिनो आणि रे झेड आर मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्यात Fascino 125 हायब्रिड, Ray ZR आणि Fascino नॉन हायब्रिड व्हर्जनवर सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहगे. कंपनीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार या स्कूटर्सच्या खरेदीवर 2,999 रूपयांचे गिफ्ट्स आणि 20 हजार रूपयांची अतिरिक्त सूट देण्यात येत आहे.

याशिवाय कंपनी तामिळनाडू सोडून अन्य सर्व राज्यांमध्ये स्क्रॅच अँड विन ही ऑफरही देत आहे. याअंतर्गत ग्राहकांना 35 हजार रूपयांपर्यंतचं आकर्षक गिफ्ट आणि 1 लाख रूपयांपर्यंतचे बंपर प्राईज जिंकण्याची संधी मिळणार आहे.

या स्कूटर्सवर कंपनी आकर्षक फायनॅन्स ऑफर्सही देत आहे. या अंतर्गत ग्राहकांना 999 रूपयांचं डाऊनपेमेंट करून ही स्कूटर फायनॅन्सवर घरी नेता येणार आहे.

तामिळनाडू सोडून भारतातील अन्य सर्व राज्यांमध्ये ही स्कीम लागू करण्यात आली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ही स्कीम ३१ ऑगस्ट पर्यंत लागू राहणार आहे.

Yamaha Fascino 125 ही स्कूटर फ्युअल इंजेक्टेड हायब्रिड टेक्नॉलॉजीसोबत बाजारात येते. या स्कूटरमध्ये 125CC च्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 8.2Ps ची पॉवर आणि 10.3Nm चा टॉर्क जनरेट करते.

नव्या माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानामुळे स्कूटरच्या एक्झेलरेशन आणि मायलेज दोन्ही उत्तम झालं आहे. ही स्कूटर ड्रम आणि डिस्क या दोन व्हेरिअंट्समध्ये येते. या स्कूटरची किंमत 70 हजार ते 76300 रूपयांच्या दरम्यान आहे.

Yamaha Ray ZR 125 ही स्कूटर दोन व्हेरिअंट्समध्ये येते. यामध्ये झेडआर आणि स्ट्रीट रॅली यांचा समावेश आहे. यामध्ये कंपनीनं 125cc क्षमतेच्या एअर कुल्ड, फ्लुअल इंजेक्टेड ब्लू कोअर इंजिनचा वापर करण्यात आला आहे.

हे इंजिन 8.2 PS ची पॉवर आणि 9.7 Nm चा टॉर्क जनरेट करते. या स्कूटरचं मायलेज यापूर्वीच्या स्कूटरच्या मायलेजच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढलं असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

या स्कूटरची किंमत 73,300 रूपयांपासून 77,330 रूपयांच्या दरम्यान आहे. यामध्ये स्मार्ट मोटर जनरेटरचा (SMG) वापर करण्यात आला आहे. याद्वारे इलेक्ट्रीक स्टार्टरच्या तुलनेत सायलेंट स्टार्ट मिळतो. याशिवाय स्टॉप स्टार्ट फीचर आणि इनबिल्ट साईड स्टँड कट ऑफ स्विचही देण्यात आला आहे.

Read in English