बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:15 IST2026-05-19T17:14:20+5:302026-05-19T17:15:11+5:30

CM Devendra Fadnavis CMO News: मंत्रालयात आयोजित एका बैठकीत अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये राज्य शासनासोबत विविध कंपन्यांचे सामंजस्य करार करण्यात आले.

cm devendra fadnavis presided over the signing and exchange of MoUs between the maharashtra govt energy department and various companies | बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

CM Devendra Fadnavis CMO News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र शासन (ऊर्जा विभाग) आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले.  मंत्रालयात आयोजित एका बैठकीत अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये राज्य शासनासोबत विविध कंपन्यांचे सामंजस्य करार करण्यात आले. एनटीपीसीएल (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड), अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे. 

या बैठकीला पारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसी लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल, अदानी पॉवर कंपनीचे बिझनेस हेड विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यूक्लिअर एनर्जी बिजनेसचे अध्यक्ष रंजय शरण आदी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

सामंजस्य करारांचे तपशील

अदानी पॉवर लिमिटेड व त्यांची कोस्टल-महा ॲटोमिक एनर्जी लिमिटेड 

बारसू, जि. रत्नागिरी येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार.

- प्रस्तावित स्थापित क्षमता - ६००० मेगावॅट
- प्रस्तावित गुंतवणूक - ₹१,५०,००० कोटी
- प्रत्यक्ष+अप्रत्यक्ष रोजगार संधी : ४,५०० + ७,५०० = १२,०००

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड

पूर्णगड जि. रत्नागिरी येथे 'भारत स्मॉल रिॲक्टर्स' / स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (SMR)/ अणुऊर्जा रिॲक्टर प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार.

- प्रस्तावित स्थापित क्षमता: २ X २२० मेगावॅट ते ६ X १२०० मेगावॅट
- प्रस्तावित गुंतवणूक: ₹८,००० ते ₹२,००,००० कोटी
- प्रत्यक्ष + अप्रत्यक्ष रोजगार करार: ३००० + १,००,००० = १,०३,०००

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ लिमिटेड (एनटीपीसी)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार.

- प्रस्तावित स्थापित क्षमता: एकूण ६ युनिट्सद्वारे ४,००० ते ७,२०० मेगावॅट.

- प्रस्तावित गुंतवणूक: ₹१,००,००० कोटी

- प्रत्यक्ष + अप्रत्यक्ष रोजगार करार: ५०००

Web Title : बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्ग में परमाणु ऊर्जा परियोजनाएं; समझौते पर हस्ताक्षर

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने रत्नागिरी और सिंधुदुर्ग जिलों में परमाणु ऊर्जा परियोजनाओं के लिए अडानी, रिलायंस और एनटीपीसी के साथ समझौते किए। परियोजनाओं से महत्वपूर्ण निवेश और रोजगार सृजन का वादा किया गया है।

Web Title : Nuclear Power Projects Planned in Barsu, Purnagad, Sindhudurg; Agreements Signed

Web Summary : Maharashtra government signed agreements with Adani, Reliance, and NTPC for nuclear power projects in Ratnagiri and Sindhudurg districts. Projects promise significant investment and job creation.