"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:24 IST2026-05-19T17:21:27+5:302026-05-19T17:24:35+5:30

जो कोणी सायोनी घोष यांचे शीर कापून आणेन, त्याला १ कोटी रुपयांचे बक्षिस देता येईल." सिकंदराबाद येथे एका निदर्शनादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. सायोनी यांची पोस्ट म्हणजे, हिंदू देवी देवतांचा अपमान असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. या मुद्द्यावर संघटना ३१०० किलोमीटरची पदयात्राही काढत आहे.

A reward of Rs 1 crore will be given to anyone who beheads Sayoni Ghosh BJP leader's controversial statement, announced Rs 1 crore; Party said- his personal views | "सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 

"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील सिकंदराबाद नगरपालिकेचे अध्यक्ष भाजप नेते डॉक्टर प्रदीप दीक्षित यांनी पश्चिम बंगालमधील टीएमसी (TMC) खासदार सायोनी घोष यांच्यासंदर्भात एक वादग्रस्त विधान केले आहे. दीक्षित यांनी सायोनी यांचे शीर कलम करणाऱ्याला १ कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. सायोनी यांच्या शिवलिंगाशी संबंधित एका जुन्या व्हायरल पोस्टवरून त्यांनी हे विधान केले आहे.

काय म्हणाले दीक्षित -
प्रदीप दीक्षित यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात ते म्हणत आहेत, "मी रोज एक तास भगवान शीव शंकर यांची पूजा करतो. टीएमसी खासदार सायोनी घोष यांच्या कृत्याने मी अतिशय दुखावलो गेलो आहे. जो कोणी सायोनी घोष यांचे शीर कापून आणेन, त्याला १ कोटी रुपयांचे बक्षिस देता येईल." सिकंदराबाद येथे एका निदर्शनादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. सायोनी यांची पोस्ट म्हणजे, हिंदू देवी देवतांचा अपमान असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. या मुद्द्यावर संघटना ३१०० किलोमीटरची पदयात्राही काढत आहे.

नेमकं प्रकरण काय? - 
२०१५ मध्ये सायोनी घोष यांच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ती पोस्ट २०२१ आणि आता २०२६ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यानही जबरदस्त चर्चेत आली. यापूर्वीही या पोस्टवरून घोष यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल झाली होती. मात्र, २०१५ मध्ये त्यांचे अकाउंट हॅक झाले होते आणि हॅकरनेच तो फोटो पोस्ट केला होता. अकाउंट रिकव्हर झाल्यानंतर, आपण ती पोस्ट डेलिट केली होती, असेही घोष यांनी म्हटले होते.

काँग्रेस भाजपची प्रतिक्रिया - 
दीक्षित यांच्या या विधानावर बुलंदशहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जियाउर रहमान यांनी तीव्र आक्षेप घेत पोलीस कारवाईची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, हे दीक्षित यांचे वैयक्तिक विधान आहे. याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असे भाजप जिल्हाध्यक्ष विकास चौहान यांनी म्हटले आहे.

 

Web Title : भाजपा नेता का ऐलान: TMC सांसद का सिर काटने पर 1 करोड़!

Web Summary : भाजपा नेता ने टीएमसी सांसद सायोनी घोष का सिर काटने पर 1 करोड़ रुपये का इनाम घोषित किया। कांग्रेस ने कार्रवाई की मांग की। भाजपा ने इसे निजी विचार बताया।

Web Title : BJP Leader's Bounty: 1 Crore for TMC MP's Beheading!

Web Summary : BJP leader offered ₹1 crore for beheading TMC MP Sayoni Ghosh over an old social media post. Congress demands action. BJP distances itself, calling it a personal view.