पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येवला तालुक्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना पाणी सोडण्यासाठी करण्यात येणा-या चाचणीसाठी कालव्याच्या साफसफाईस प्रारंभ करण्यात आला आहे. ...
शहराला लागून असलेल्या औंदाणे परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून हत्ती नदीवर बांधलेला बंधारा गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने तुडुंब भरला आहे. या पाण्यामुळे परिसराला पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाला लाभ होणार आहे. ...
दि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेत केलेले सभासद, नूतनीकरण व पोटनिवडणूक यासह विविध मागण्यांबाबत चौकशी करण्याचे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम बेलसाणे यांच्या आश्वासनानंतर व सहकार विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर कमकोचे माजी संचालक कैलास जाधव यांनी ...
तालुक्यातील चिंचोले येथे भारतीय सैन्य दलातील जवानांचा व त्यांचे कुटुंबीयांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्याचा अभिनव उपक्रम चांदवड पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी राबविला. ...
लोकसभा निवडणुकीची तयारी करताना शिवसेनेने नाशिकची जागा ताब्यात ठेवण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या ऐवजी अन्य पक्षांतील परंतु निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्या उमेदवारांचा शोध घेण्यास सुरुवात केल्यामुळे पक्ष गोडसे यांच्या पाच वर्षांच्या कामगिरीवर नार ...
श्री हरी सत्संग समिती आणि नाशिकरोड माहेश्वरी सभा यांच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त आर्टिलरी सेंटररोड, महेश भवन येथे शिव विवाह महोत्सवाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. यावेळी वनवासी कथाकार प.पू. गणेशदासजी महाराज यांचे कथा व भजन झाले. ...
अगोदरच उशिराने केलेली पेरणी व त्यातच तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने मारलेल्या दडीमुळे नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व कापूस पीक धोक्यात आले असून, पावसाअभावी सोयाबीनला लागणाऱ्या फुलांच्या संख्येत घट झाली ...
शहरात असलेल्या ८२ हजार विद्युत पथदीपांची अवस्था आता सुधारणार असून, स्मार्ट सिटी अंतर्गत अद्ययावत पथदीप बसविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय प्रभागातदेखील अडीच हजार पथदीप बसवण्यात येणार आहे. ...
दैनंदिन कामकाजातून विरंगळा म्हणून सहली करण्यापेक्षा गिर्यारोहण आणि पंढरपूरची वारी करण्याचा उपक्रम करणारे समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी यंदाही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण करणार आहेत. ...