माहेश्वरी सभेतर्फे  शिव विवाह महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:10 AM2018-08-18T01:10:02+5:302018-08-18T01:10:19+5:30

श्री हरी सत्संग समिती आणि नाशिकरोड माहेश्वरी सभा यांच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त आर्टिलरी सेंटररोड, महेश भवन येथे शिव विवाह महोत्सवाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. यावेळी वनवासी कथाकार प.पू. गणेशदासजी महाराज यांचे कथा व भजन झाले.

Shiva Vivah Mahotsav by Maheshwari Sabha | माहेश्वरी सभेतर्फे  शिव विवाह महोत्सव

माहेश्वरी सभेतर्फे  शिव विवाह महोत्सव

googlenewsNext

नाशिकरोड : श्री हरी सत्संग समिती आणि नाशिकरोड माहेश्वरी सभा यांच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त आर्टिलरी सेंटररोड, महेश भवन येथे शिव विवाह महोत्सवाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. यावेळी वनवासी कथाकार प.पू. गणेशदासजी महाराज यांचे कथा व भजन झाले.  शिव विवाह महोत्सवानिमित्त परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर ओमप्रकाश सोमाणी यांच्या हस्ते कलश व ग्रंथपूजन झाले. यावेळी वनवासी कथाकर प.पू. गणेशदासजी महाराज यांनी आदिवासींच्या प्रगती बरोबर त्याचे प्राचीन धर्म आणि संस्कृतीचे ओळख व्हावी यासाठी श्रीहरी सत्संग समितीच्या वतीने आदिवासी बांधवांना कथा भजन विशेष प्रशिक्षण देऊन केले जाते. त्यामुळे वनवासी समाजामध्ये एक आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागृत होतो. तरुणांना व्यसनमुक्ती तसेच धार्मिक व आध्यात्मिक जनजागृती कथा व भजनद्वारे श्रीहरी सत्संग समितीतर्फे विविध शहरामध्ये केले जाते.  यावेळी श्रीनिवास लोया, अशोक तापडिया, रामेश्वर जाजू, राधेश्याम राठी, राधेश्याम बूब, शकुंतला करवा, चंद्रकला सोमाणी, कल्पना लोया, हेमा बूब, रामरतन राठी, रामकिसन कलंत्री, किशोर राठी, श्रीकृष्ण सोमाणी, प्रकाश पाटील, राजेश पारिख, जगदिश काबरा, विजय तळेगावकर, अनिल कलंत्री, आशिष भन्साळी जितेंद्र सोमाणी, वासुदेव लालाभाला आदी उपस्थित होते.

Web Title: Shiva Vivah Mahotsav by Maheshwari Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक