चिंचोले येथे जवानांसह कुटुंबीयांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:15 AM2018-08-18T01:15:22+5:302018-08-18T01:16:00+5:30

तालुक्यातील चिंचोले येथे भारतीय सैन्य दलातील जवानांचा व त्यांचे कुटुंबीयांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्याचा अभिनव उपक्रम चांदवड पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी राबविला.

 Housewives felon with soldiers and soldiers in Chinchole | चिंचोले येथे जवानांसह कुटुंबीयांचा सत्कार

चिंचोले येथे जवानांसह कुटुंबीयांचा सत्कार

Next

चांदवड : तालुक्यातील चिंचोले येथे भारतीय सैन्य दलातील जवानांचा व त्यांचे कुटुंबीयांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्याचा अभिनव उपक्रम चांदवड पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी राबविला.  कोणताही सण असा अथवा उत्सव असो भारतीय सैन्य दलातील जवानांना सण व उत्सव स्वत:चे कुटुंबासोबत साजरा करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक पाटील यांनी चिंचोले येथे जाऊन हा उपक्रम राबविला. त्यात चिंचोले येथील भारतीय सैन्य दलातील जवान संदीप विलास जाधव हे अल्चर राजस्थान येथे सेवेत असून, गणेश विलास जाधव हे सियाचीन येथे कार्यरत आहेत. त्यांचे माता-पिता विलास पुंडलिक जाधव, कमलाबाई विलास जाधव व सैनिकांच्या पत्नी यांचा सत्कार केला. प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी यांनी केले. पोलीस हवालदार चंद्रकांत निकम, संदीप जाधव, सरपंच कावेरी बाळासाहेब जाधव, ग्रामसेवक श्रीमती पाटील यांची भाषणे झाली.  यावेळी दिगंबर जाधव, उपसरपंच शंकर जाधव, बापुराव जाधव, विजय जाधव, बापू चव्हाण, जगन्नाथ मोरे, योगेश हेंबाडे, देशमुख, सागर शेवाळे आदिसह चिंचोले ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Housewives felon with soldiers and soldiers in Chinchole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.