Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Photographer Salary: विराट-अनुष्का, विकी-कटरिना, प्रियांका-निक या सेलिब्रिटींच्या लग्नातही हाच फोटोग्राफर होता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:33 AM2024-06-17T10:33:52+5:302024-06-17T10:35:46+5:30

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Photographer Salary: विराट-अनुष्का, विकी-कटरिना, प्रियांका-निक या सेलिब्रिटींच्या लग्नातही हाच फोटोग्राफर होता

Anant Ambani Radhika Merchant pre wedding celebrity photographer joseph radhik fee charges whopping 1 lakh 50 thousand per day | अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

Anant Ambani Radhika Merchant Marriage Photographer Salary: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह १२ जुलैला होणार आहे. मर्चंट कुटुंबातील मुलगी राधिका मर्चंट ही त्याच्याबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाच्या उत्सवाला खूप आधीपासूनच सुरुवात झाली आहे. पहिली प्री-वेडिंग पार्टी जामनगरमध्ये केल्यानंतर, अलीकडेच त्यांची दुसरी प्री-वेडिंग पार्टी युरोपमधील आलिशान क्रूझवर झाली. हे लग्न बिग बजेट असल्याने यातील सगळ्याच गोष्टी महागड्या असणार हे तर ओघाने आलेच. त्यातच या लग्नातील फोटोग्राफरची आता चर्चा रंगली आहे. जाणून घेऊया कोण आहे हा फोटोग्राफर जोसेफ राधिक (Joseph Radhik) आणि त्याचे तगड मानधन याविषयी...

प्री-वेडिंग पार्ट्यांमध्ये सर्वांनाच सोहळ्याची भव्यता आणि दिव्यता दिसून आली. ही गोष्ट टिपण्यासाठी ज्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे तो म्हणजे, जोसेफ राधिक आणि त्याची टीम. जोसेफने विविध अप्रतिम कार्यक्रमांचे फोटो शेअर केले आहेत. त्यातून सोहळ्याची भव्यता आणि वैभव स्पष्ट दिसून येते.

जोसेफ राधिकचे मानधन किती?

एका रिपोर्टनुसार, प्रख्यात सिनेमॅटोग्राफर जोसेफ राधिक त्याच्या सेवेसाठी दररोज १.२५ लाख ते १.५० लाख रुपये इतके तगडे मानधन घेतो. याशिवाय त्याचा व टीमचा राहण्याचा आणि प्रवासाचा खर्चही ग्राहक उचलतो. प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो जोसेफ राधिकने काढले आहेत. त्यातूनच जोसेफ राधिक अन् टीमचे अप्रतिम काम पाहता येऊ शकते.

फोटोग्राफीमध्ये करिअर करण्यापूर्वी जोसेफ राधिकने सहा वर्षे इंजिनियरिंगचा अभ्यास केला. मग तीन वर्षे नोकरी केल्यानंतर २०१० मध्ये नोकरी सोडून फोटोग्राफर बनण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. जोसेफने कतरिना-विकी कौशल, विराट-अनुष्का, सिद्धार्थ-कियारा, केएल राहुल-अथिया अशा अनेक सेलिब्रिटींच्या लग्नात फोटो व सिनेमॅटोग्राफी केली असून त्याने बॉलिवूड व क्रिकेट स्टार्समध्ये चांगला नावलौकिक मिळवला आहे.

------------

------------

Web Title: Anant Ambani Radhika Merchant pre wedding celebrity photographer joseph radhik fee charges whopping 1 lakh 50 thousand per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.