शहरातील रस्त्यांवर रोडरोमियोंचा वावर वाढला आहे. विद्यार्थिनींची छेड काढणे, त्यांचा पाठलाग करणे यामुळे शालेय विद्यार्थिनी त्रस्त आहे. मंगळवारी शहरात वेगवेगळ्या भागात आठ तासात विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या चार घटना घडल्या. ...
दोन दिवस तुरळक प्रमाणात आल्यानंतर बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह तासभर आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभरात शहरामध्ये ४८.१ मिमी पावसाची नोंद झाली. ...
वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालक (डीजीजीआय) कार्यालयाच्या नागपूर युनिटने नागपुरातील पाच मोठ्या ऑटोमोबाईल डीलर्सकडून व्याजासह कोट्यवधींचा जीएसटी वसूल केला आहे. ...
बुधवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील भोजनाची गुणवत्ता तपासण्यात आली. ...
शहरातील रोडवरील खड्डे व खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांविषयी अत्यंत गांभीर्याने वृत्तांकन केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वृत्तपत्रांचे कौतुक केले. ...
विदर्भात काळ्या पैशांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाच्या सराफ चेंबर येथील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्ष २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती आयकर विभागाचे प्रधान संचालक (अन्वेषण) जय राज कालरा यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फे शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होत असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. ...