आधी शंभर रुपयांच्या खरेदीत आठवडाभराची भाजीपाल्याची सोय व्हायची. आता त्याच शंभर रुपयात दोन तीन संजांचाही भाजीपाला मिळत नाही. त्यामुळे महिला भांबावल्या आहेत. अलिकडे हिरव्या भाजीपाल्याचे ऐवजी दैनंदिन जेवणात कडधान्यांचा वापर वाढला असून या महागाईला पर्याय ...
जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसराला लागून आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा शिवारात नेहमी संचार असतो. परतीच्या पावसानंतर कापणीला आलेल्या धानाची प्रामुख्याने रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी जड धानपिका ...
डिजिटल युगाची गरज लक्षात घेता महिलांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी ‘डिजिटल साक्षरता अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या दरम्यान स्वयंसेवी संस्थामार्फत राज्यभरात १०० कार्यशाळा घेवून महिलांना प्रशिक्षित केले ...
ई-नाम इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हे केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे तयार केले. राज्यातील अस्तित्वात असलेल्या कोणत्याही बाजार समितीला सेवा प्रदान करते (जरी नियमन केलेले किंवा खासगी असले तरीही) ई-नामसाठी विकसित केलेला विशे ...
शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, विद्युत विभाग, पाणीपुरवठा व अन्य सेवा क्षेत्रातील पदांच्या भरती करताना मुख्यालयी राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र एकदा नोकरी लागल्यानंतर कोणीही गावांमध्ये थांबत नाही. ग्रामीण भागातील अनेक योजना, उपक्रम व सु ...
नागभीड- नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी २५ नोव्हेंबरपासून कायमची बंद केल्यानंतर १ डिसेंबरपासून ब्रॉडगेजचे काम सुरू होणार आहे. नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकावरून मंडळ प्रबंधक बंदोपाध्याय यांनी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी पाहणीला ...
यावर्षी पावसाचे आगमन लांबले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दरवर्षी साधारणत: दसºयानंतर शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन व कापूस हे नगदी पीक येतात त्यामुळे शेतकºयांची दिवाळी आनंदात जाते. परंतु यावर्षी नेमका याच काळात अवकाळी पावसाने ध ...
वन्यजीवाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील गावागावात वाघ व बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. नॉन बफरमध्ये दोन इसमाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असताना बफर परिक्षेत्रातील मूल-मारोडा रस्त्यावरील वर्दळीच्या मार्गावर दोन वाघाचे दर् ...
पावसाळा संपल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत सतत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस, भात व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले असून कपाशीला कोंब फूटले. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने श ...
या पथकाकडून अशा ट्रॅव्हल्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेत येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आजघडीला २६९ खासगी ट्रॅव्हल्स धावत आहेत. या ट्रॅव्हल्स चंद्रपूर ते नागपूर, चिमू ...