Vegetable prices shrink | भाजीपाल्याचे भाव कडाडले गृहणीचे बजेट बिघडले
भाजीपाल्याचे भाव कडाडले गृहणीचे बजेट बिघडले

ठळक मुद्देकांदा ७० रुपये किलो। आर्थिक गणित जुळविताना अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
आयुधनिर्माणी : यंदा पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला पिके उशीरा निघत असल्याने बाजारात अन्य राज्यांतून भाजीपाला आयात करावा लागत आहे. त्यामुळे सध्या भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दैनंदिन आहारात आवश्यक असणारा भाजीपाला कडाडल्याने सामान्य गृहीणींचे बजट बिघडले आहे. रोजीरोटीचा व्यवसाय करून हातावर आणून पानावर खाणाºया गरीब व सामान्य कुटुंबानचेही आर्थिक गणित कोलमडले आहे.
आधी शंभर रुपयांच्या खरेदीत आठवडाभराची भाजीपाल्याची सोय व्हायची. आता त्याच शंभर रुपयात दोन तीन संजांचाही भाजीपाला मिळत नाही. त्यामुळे महिला भांबावल्या आहेत. अलिकडे हिरव्या भाजीपाल्याचे ऐवजी दैनंदिन जेवणात कडधान्यांचा वापर वाढला असून या महागाईला पर्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. चिल्लर ग्राहकांना भाजीपाला प्रती पाव विकत घ्यावा लागत आहे. त्यातच कांद्याने ७० पार केल्याने मोठी पंचाईत होत आहे. त्यासोबच पालक १५ रुपये, अद्रक ३० रुपये, काकडी १० रुपये, तोंडळे १५ रुपये , सिमला मिर्ची २० रुपये, फूल कोबी २० रुपये, पत्ता कोबी १५ रुपए , ढेमस २० रुपये, सांबार ६० रुपये , मेथी २० रुपये, चवळी भाजी २० रुपये, कारले १५ रुपये, चवळी शेंगा २० ते २५ रुपये, टमाटर १५ रुपये, भेंडी १५ रुपये, वांगे २० रुपये, लौकी १० रुपये, गाजर ३० रुपये, बीट २० रुपये, कांदे २० रुपये, आलू सात रुपये, मेथी २५ ते ३० प्रमाणे कमीजास्त भावात भाजीपाला विकला जात आहे. त्यामुळे पूर्वी शंभर ते २०० रुपयात होणारा बाजाराला आता ४०० रुपये लागत आहेत.

आपल्या भागात भेंडी, वांगे, चवळी, पालक हाच भाजीपाला पिकतो. आपल्याकडे मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश वगैरे भागातून भाजीपाला येतो. शेतकऱ्यांचा भाजीपाला निघायचा असल्याने भावात थोडाफार फरक पडत आहे. शेतकºयांचा माल बाजारात आल्यास भाव कमी होण्याची शक्यता आहे.
- गुलाब पाकमोडे, भाजीपाल्याचे ठोक व्यापारी,भद्रावती

Web Title: Vegetable prices shrink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.