रेल्वे प्रबंधकांकडून नॅरोगेजची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST2019-11-16T06:00:00+5:302019-11-16T06:00:30+5:30

नागभीड- नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी २५ नोव्हेंबरपासून कायमची बंद केल्यानंतर १ डिसेंबरपासून ब्रॉडगेजचे काम सुरू होणार आहे. नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकावरून मंडळ प्रबंधक बंदोपाध्याय यांनी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी पाहणीला सुरूवात केली. तब्बल ४ तासांनी म्हणजे २ वाजून ३५ मिनिटांनी त्या नागभीड रेल्वेस्थानकावर पोहोचल्या.

Narrogage inspection by train managers | रेल्वे प्रबंधकांकडून नॅरोगेजची पाहणी

रेल्वे प्रबंधकांकडून नॅरोगेजची पाहणी

ठळक मुद्देअधिकाऱ्यांशी चर्चा : १ डिसेंबरपासून काम सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागपूर विभागाच्या रेल्वे मंडल प्रबंधक शोभना बंदोपाध्याय यांनी गुरूवारी नागपूर - नागभीड या नॅरोगेज रेल्वे गाडीने प्रवास करून ब्रँडगेज मार्गाच काम सुरू करताना कोणत्या अडचणी येणार याची माहिती जाणून घेतली.
नागभीड- नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी २५ नोव्हेंबरपासून कायमची बंद केल्यानंतर १ डिसेंबरपासून ब्रॉडगेजचे काम सुरू होणार आहे. नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकावरून मंडळ प्रबंधक बंदोपाध्याय यांनी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी पाहणीला सुरूवात केली. तब्बल ४ तासांनी म्हणजे २ वाजून ३५ मिनिटांनी त्या नागभीड रेल्वेस्थानकावर पोहोचल्या. या चार तासांच्या दौऱ्यात बंदोपाध्याय यांनी ब्राँडगेज मार्गाविषयी संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी वरिष्ठ सहाय्यक मंडल अभियंता ए. टी. पांडे यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रवाशांची वाढली लगबग
ब्रिटीशांनी १९१३ रोजी नागपूर- नागभीड मार्गावर ही नॅरोगेज रेल्वे सुरू केली होती. तेव्हापासून ही गाडी अव्याहत धावत आहे. आतापर्यंत या परिसरातील लाखो प्रवाशांनी या रेल्वेने प्रवास केला. अनेकांकडे या रेल्वेच्या आठवणी आहेत. यापुढे या रेल्वेने प्रवास करता येणार नसल्याने मागील आठवड्यापासून बºयाच प्रवाशांनी जाणीवपूवर्क प्रवास करत आहेत. त्यामुळे नागभीड रेल्वेस्थानकावर लगबग वाढली आहे.

Web Title: Narrogage inspection by train managers

टॅग्स :railwayरेल्वे