वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने खरीप पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:00:57+5:30

जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसराला लागून आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा शिवारात नेहमी संचार असतो. परतीच्या पावसानंतर कापणीला आलेल्या धानाची प्रामुख्याने रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी जड धानपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे कापणीला अद्याप वेळ आहे. सध्या हे पीक शेतात उभे असतानाच अवकाळी पावसाने नुकसान केले. पावसाने आता उसंत दिली.

Loss of kharif crops due to wildlife infestation | वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने खरीप पिकांचे नुकसान

वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने खरीप पिकांचे नुकसान

Next
ठळक मुद्देशेतकरी मेटाकुटीला; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एकीकडे निसर्गाच्या संकटाचा सामना करताना दमछाक होत असताना दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहे. जिल्ह्यातील वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाने यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसराला लागून आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा शिवारात नेहमी संचार असतो. परतीच्या पावसानंतर कापणीला आलेल्या धानाची प्रामुख्याने रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी जड धानपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे कापणीला अद्याप वेळ आहे. सध्या हे पीक शेतात उभे असतानाच अवकाळी पावसाने नुकसान केले. पावसाने आता उसंत दिली.
शेतकरी कापणी करत असताना डुकरांकडून नासाडी होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. वन विभागाकडून पंचनामे केले जात आहेत. काही शिवारात पंचनाम्याची कामे सुरू आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार होईल. त्यानंतर शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळविण्यासाठी बराच कालवधी लागण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांमध्ये दहशत
जंगल परिसरात वन्यप्राण्यांचा नेहमीच मोठ्या प्रमाणात संचार आहे. वन्यप्राण्यांनी शेतकरी तसेच रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांवर अनेकदा प्राणघातक हल्ले केले. अनेकांचा मृत्यू झाला. मात्र अद्याप शासनाने प्रभावी उपाययोजना केली नाही. चिमूर, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी तालुक्यातील भातशेती प्रामुख्याने जंगल भागाला लागूनच आहे. त्यामुळे शेतकºयांना जीव मुठीत घेऊनच शेतीची कामे करावी लागत आहेत.

सरपंचांशी हवा समन्वय
रबी हंगामातील हरभरा पिकाचे दरवर्षीच नुकसान होते. गावस्तरावर जनजागृती करून वनविभागाने मोहीम राबविण्याची गरज आहे. काही ठिकाणी वनरक्षकांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे. परंतु सरपंच, उपसरपंच तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी वनरक्षक व अन्य वन कर्मचाऱ्यांचा समन्वय वाढविण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Loss of kharif crops due to wildlife infestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी