Next

'या' गुंतवणूकदारानं का घेतली मोदींची भेट?चर्चांना उधाण | Rakesh Jhunjhunwala Meets PM Modi | Bigbull

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 10:28 AM2021-10-07T10:28:04+5:302021-10-07T10:28:31+5:30

देशातील एका दिग्गज शेअर ब्रोकर अर्थात शेअर दलालानं मोदींची भेट घेतलीय. फक्त या शेअर दलालानं नाही तर त्याच्या बायकोनंही. शेअर मार्केटमध्ये या जोडीला बिग बुल म्हटलं जातं किंवा टॉपचं गुंतवणूकदार कपल म्हटलं जातं. चुरगळलेल्या आणि इस्त्रीही न केलेल्या ढील्या-ढाल्या शर्टात दिसतायंत बिग बुल राकेश झुनझुनवाला. आता झुनझुनवालांनी ही भेट का घेतली? झुनझुनवाला-मोदींचे फोटो व्हायरल का होतायंत, झुनझुनवालांच्या शर्टाची चर्चा का सुरु झालीय? जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात तेव्हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.