वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
केंद्र सरकारने संमत केलेले नागरिकत्व सुधारणा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हे दोन्ही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी पुकारलेल्या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. ...
एनआरसी व सीएए कायदा संविधान विरोधी असल्याचा आरोप करत या कायद्याला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी बंद पुकारण्यात आला. या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी, महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. ...