वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar News: महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ आहे. या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ...
Prakash Ambedkar News: पहलगाम हल्ल्यावरून देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. ...
Prakash Ambedkar News: इतर पक्ष वाटप करतात आणि भाजपा-आरएसएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. ही प्रेमाची नव्हे तर राजकीय भेट आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ...
VBA Prakash Ambedkar News: अयोध्यापासून आता राजकीय फायदा नाही पण औरंगजेबची मजारपासून राजकीय फायदा आहे म्हणून हे दुसरे अयोध्या होण्याची शक्यता आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...