लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी औरंगाबादेत ८ एप्रिल रोजी सकाळी १० वा. क्रांतीचौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार आहे. ...
जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प आता ७८९ कोटी रुपयांवरून ५०० कोटींच्या आसपास अंदाजपत्रकात बसवून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दळणवळण मंत्रालयाकडून नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मराठवाडा विभागाला देण्यात आल्या आहेत. ...
दोन महिन्यांपूर्वी बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडलेला ४१ लाख ३७ हजार रुपये किंमतीचा ६ क्विंटल ८९ किलो गांजा न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी नष्ट करण्यात आला. यातील ट्रक व एक आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे ...