मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange-Patil: जळगाव जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी आज रविवारी चाळीसगाव येथे व्यक्त केला. ...
Maratha Reservation: कोणाच्या दबावाखाली येऊन शासनाने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर कोट्यवधी मराठे मुंबईत धडकतील आणि शांततेचे हे आंदोलन तुम्हाला जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. ...