Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 09:07 IST2026-04-30T09:06:20+5:302026-04-30T09:07:04+5:30

Bengaluru Bowring Hospital Wall Collapse: बंगळुरूमध्ये रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली, यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

Bengaluru Tragedy: 7 Dead, Including Child, as Hospital Compound Wall Collapses Amid Heavy Rain | Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!

Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!

बंगळुरूमध्ये बुधवारी संध्याकाळी बोरिंग रुग्णालयाजवळ संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची घोषणा केली.

नेमकं काय घडलं?

बुधवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एका चिमुकलीसह काही जणांनी बोरिंग रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीजवळ आश्रय घेतला. मात्र, त्याच वेळी संरक्षक भिंत कोसळली आणि अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथकाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, सात जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांची ओळख पटली असून फयाज अहमद (वय, ३९), मोहम्मद अब्दुल हक ( वय, ५२), मुसफिरा (वय, ७), के.के. लता (वय, ५७), स्मिता  (वय, ४७), मोहम्मद सलाउद्दीन (वय, ३६) आणि नसीमउल्ला (वय, १९) अशी त्यांची नावे आहेत. मृतांपैकी दोन महिला केरळच्या रहिवासी असल्याचे समजत आहे.

मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. तसेच त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी त्यांनी माहिती दिली. तर, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी म्हटले की, या घटनेनंतर माझी पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली. या घटनेतील जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना कशाप्रकारे मदत पुरवता येईल, चा मी तिथे जाऊन आढावा घेईन."

कर्नाटक: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरला बसची धडक; तिघांचा मृत्यू

कर्नाटकात उडुपी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका टँकरला, प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एका बसने बुधवारी धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, इतर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बायंदूर तालुक्यामधील त्रासी बीचजवळ हा अपघात घडला. बस मुरुडेश्वरहून उडुपीच्या दिशेने जात असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बसमध्ये अंदाजे ४७ प्रवासी प्रवास करत होते.

Web Title : बेंगलुरु में दीवार गिरने से हादसा, बच्ची समेत सात की मौत, कई घायल

Web Summary : बेंगलुरु में बोरिंग अस्पताल के पास दीवार गिरने से एक बच्ची सहित सात लोगों की मौत हो गई और सात घायल हो गए। कर्नाटक के मुख्यमंत्री ने पीड़ितों के परिवारों के लिए मुआवजे की घोषणा की और जांच के आदेश दिए। उडुपी में बस-टैंकर की टक्कर में तीन की मौत हो गई।

Web Title : Bengaluru Wall Collapse: Seven Dead, Including Child, Several Injured

Web Summary : In Bengaluru, a wall collapse near Boring Hospital killed seven, including a child, and injured seven due to heavy rains. Karnataka's Chief Minister announced compensation for the victims' families and ordered an investigation. Separately, a bus-tanker collision in Udupi resulted in three fatalities and several injuries.