आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 07:40 IST2026-04-30T07:32:22+5:302026-04-30T07:40:01+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
मेष - आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित राहण्यात मदत करेल. घरात सुखद प्रसंग घडतील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात आपणाला यशकीर्ती लाभ होईल. आणखी वाचा
वृषभ - आज वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. दुपार नंतर ह्या तक्रारीपासून मुक्तता मिळेल. मानसिक दृष्टया सुद्धा तणाव दूर झाल्याचा अनुभव येईल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील. संतती विषयक चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी निर्माण होतील. आणखी वाचा
कर्क - आज हातून एखादे कार्य अविचाराने होईल, तेव्हा काळजी घ्यावी. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद होईल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल. मनोबल चांगले असल्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सकाळी आपल्या गोड बोलण्याने इतरांकडून आपली कामे करवून घ्याल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. दुपार नंतर आप्तेष्टां कडून काही लाभ संभवतो. मित्रांचा सहवास घडेल. आणखी वाचा
कन्या - आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला मोठे लाभ होतील. इतर लोकांशी असणार्या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट - कचेरी पासून शक्यतो दूर राहणे हितावह राहील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. मित्रांसाठी पैसे खर्च होतील. त्याच बरोबर त्यांच्यासह फिरण्याचा आनंद लुटू शकाल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस लाभदायी आहे. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. सरकारी कामातून लाभ होतील. अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. प्रवास संभवतो. कामा संबंधी एखादी योजना आकार घेईल. आणखी वाचा
कुंभ - आज आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल. कुटुंबियांशी संभाव्य वाद टाळू शकाल. दुपार नंतर मित्रांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. भागीदाराशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊ शकतील. दुपार नंतर मात्र, प्रकृतीत अचानकपणे काही बिघाड होईल. आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा
