मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती. Read More
आचार्य प्रमोद हे प्रियांका गांधी वाड्रा यांच्या जवळचे मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर सध्या आचार्य चर्चेत आहेत. ...
काल केंद्रीय अर्थसंकल्पानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया आल्या. कर्नाटक काँग्रेसचे नेते डी के सुरेश यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले. त्यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविल्याचा गंभीर आरोप केला. ...