Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: भाडोत्री कुणीही नाही, भगव्यासाठी सर्वस्व वाहून टाकणारी मंडळी आपल्याकडे आहेत, बाकी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Political Crisis: कितीही नोटीस बजावल्या तरी घाबरणार नाही. ठरलेल्या दिवशी अमोल मिटकरींच्या घरासमोर पत्रकार परिषद घेणारच, असा ठाम निर्धार शिवा मोहोड यांनी व्यक्त केला आहे. ...
Maharashtra Political Crisis: अजित पवार सकाळी ६ वाजल्यपासून काम करायचे. आता मात्र नव्या शिंदे-भाजप सरकारमध्ये काहीच कामे होताना दिसत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Political Crisis: शहाजीबापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते, याचा त्यांना आता विसर पडला आहे, या शब्दांत शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे. ...