Maharashtra Political Crisis: “शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजे, इतके सदस्य वाढवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 09:53 PM2022-09-04T21:53:20+5:302022-09-04T21:54:36+5:30

Maharashtra Political Crisis: भाडोत्री कुणीही नाही, भगव्यासाठी सर्वस्व वाहून टाकणारी मंडळी आपल्याकडे आहेत, बाकी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

shiv sena chief uddhav thackeray praised vahatuk sena and taunt eknath shinde group over affidavit | Maharashtra Political Crisis: “शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजे, इतके सदस्य वाढवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन

Maharashtra Political Crisis: “शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजे, इतके सदस्य वाढवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन

Next

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) राज्यभरातून वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. यातच आता शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजे, इतके सदस्य वाढवा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केले आहे. 

शिवसेनेच्या वाहतूक सेनेकडून नवीन सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याकडे ११ हजार नवीन सदस्य नोंदणीची कागदपत्रे जमा केली आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. आपल्याकडे आता कुणी भाडोत्री लोकं राहिली नाहीत. जे आहेत ते सर्वजण तन-मन-धन सर्वस्व भगव्यासाठी वाहून टाकणारी लोकं आहेत. बाकी जे काही बोलायचं आहे, ते मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. याबाबत काहीही वाद नाही, असे उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना सांगितले. 

शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजे

सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजेत, एवढी आपली सदस्यसंख्या वाढत आहे. ही सगळी तुमची मेहनत आहे, असे सांगत लढण्याचा एक काळ असतो, वाहतूक सेना म्हटल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांची सवय असते. रस्त्यात खड्डे असतात तरीही आपल्याला तो रस्ता पार करायचा असतो. हे खड्डे तर आपण पार करूच, पण जे खड्डे पडलेत, त्याचे काय करायचे? हे आपण बघू, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला.
 

Web Title: shiv sena chief uddhav thackeray praised vahatuk sena and taunt eknath shinde group over affidavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.