गेले दोन महिने विविध कारणास्तव थांबलेले शिवाजी पुलाचे काम येत्या सोमवारपासून सुरू होत आहे; त्यामुळे येत्या चार दिवसांत पुलाच्या कामावरील सर्व कर्मचारी हजर होणार आहेत, तर परिसराची पुराच्या पाण्यामुळे झालेल्या अवस्थेची स्वच्छता केली जाणार आहे. ...
सत्तारूढ गटाच्या नेत्यांची गर्वाची भाषा सुरू झाली असून, आरे केले तर कारेने उत्तर दिले जाईल, असा इशारा देत मल्टिस्टेटला विरोध केला म्हणून ‘गोकुळ’ने वासाचे दूध काढले, तर संचालकांच्या गाड्या आडवा, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर, ते २ आॅक्टोबर २0१८ या कालावधीमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’अभियान राबविल ...
जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या पुढाकाराने २ आक्टोबर ते १0 डिसेंबर २0१८ या कालावधीमध्ये दांडी ते दिल्ली अशी राष्ट्रव्यापी संविधान सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. ...
ऊठसूठ शाळा खोल्या पाडण्याला (निर्लेखित करण्याला) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी चाप लावला आहे. खोल्या पाडण्याचे १५ प्रस्ताव त्यांनी थांबविले असून, या खोल्या दुरूस्त होतात का, याबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचा ...
हारपवडे (ता. पन्हाळा) येथून पाच दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या प्रेमीयुगुलाचे रविवारी (दि. २३) धामणी नदीपात्रात मृतदेह आढळले. या दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...
गणेशोत्सवानंतर मंगळवारपासून पितृपंधरवडा(पितृपक्ष) सुरू होत आहे. पितृपक्षात कुटूंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावे महालय केले जाते. दुसरीकडे अजूनही महालय कालावधीबद्दल अनेक समज-गैरसमज असल्याचे पाहायला मिळते. ...