महिनाभराच्या रजेनंतरही कामावर रुजू न होऊन बेपत्ता असलेला पोलीस अधिकारी हा गाजलेल्या हत्याकांडातील दोषी असून, सध्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे हे समजायला पोलिसांनाच तब्बल पाच महिने लागले. ...
मुंबईसह अवघ्या देशाला हादरे देणाऱ्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा अखेर आज येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. पॅरालिसिस झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्याची प्रकृती चांगली नव्हती. ...
येथील पोलीस ठाण्यातील लॉकअपला सुमारे तीन वर्ष होऊनसुद्धा अद्यापपर्यंत मान्यता न मिळाल्याने लॉकअप शोभिवंत वस्तू बनली आहे. अद्यापपर्यंत लॉकअपचा प्रस्ताव मांडला नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
चारित्र्याच्या संशयावरून लग्नाच्या वाढदिवशी आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करून ठार मारणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी जन्मठेप व २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ...