राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सरपंचांचा सन्मान उंचावण्यासोबत ग्रामविकासाच्या कामासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने निवडीनंतर पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याचा महत्त्वाचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. ...
गावचे अनेक विषय चर्चिले असता गावच्या पाणीपुरवठ्यात टी.डी.एस. चे प्रमाण जास्त असून त्यामुळे नागरिकांना मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक आहे असे स्पष्टीकरण उपसरपंच संतोष नलावडे यांनी या सभेत दिले. तसेच घनकचरा व्यवस्थापन संबंधी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ...
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील संगणक परिचालक संपावर गेले. यामुळे तालुक्यातील ११९ ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत. पुसद तालुका संगणक परिचालक संघटनेने संप पुकारला आहे. ...
वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेल्या रोपट्यांपैकी बहुतांश रोपट्यांची लागवड ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे शेकडो रोपटे इल्लुर गावातील समाज मंदिराच्या परिसरात पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजली सुध्दा आहेत. ...