११९ ग्रामपंचायती आॅफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 09:38 PM2019-08-21T21:38:01+5:302019-08-21T21:38:35+5:30

विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील संगणक परिचालक संपावर गेले. यामुळे तालुक्यातील ११९ ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत. पुसद तालुका संगणक परिचालक संघटनेने संप पुकारला आहे.

19 Gram Panchayat Offline | ११९ ग्रामपंचायती आॅफलाईन

११९ ग्रामपंचायती आॅफलाईन

Next
ठळक मुद्देपुसद तालुका : संगणक परिचालक गेले संपावर, कामकाज पडले ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील संगणक परिचालक संपावर गेले. यामुळे तालुक्यातील ११९ ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत.
पुसद तालुका संगणक परिचालक संघटनेने संप पुकारला आहे. संघटनेने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. संपूर्ण महाराष्ट्रात २२ हजार संगणक परिचालक ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल इंडियाचे काम पाहात आहे. हे संगणक परिचालक २0११ पासून संग्राम प्रकल्पात व नंतर २0१६ पासून आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून १९ प्रकारचे आॅनलाइन दाखले प्रदान करतात. यात ग्रामपंचायतीचे १ ते ३३ नमुने संगणीकृत करणे, केंद्र व राज्य सरकारच्या ११ सॉफ्टवेअरमध्ये नोंदी घेणे, प्रधानमंत्री श्रमयोगी योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकरी सन्मान योजना, कर्जमाफी आदी कामे ते करीत आहेत.
शासनाने या कामासाठी आता एका खासगी कंपनीची नियुक्ती केली. त्या कंपनीला शासन चौदाव्या वित्त आयोगातून प्रतिवर्षी प्रति केंद्र चालक एक लाख ४७ हजार रुपये अग्रीम अदा करते. त्यापैकी कंपनी व्यवस्थापन खर्च म्हणून ४५0 रुपये, स्टेशनरीसाठी दोन हजार ७00, प्रशिक्षणासाठी एक हजार ३00 रुपये आपल्याकडे ठेवून संगणक परिचालकास दरमहा केवळ पाच ते सहा हजार रुपये मानधन देते. विशेष म्हणजे हे मानधनही नियमित न देता चार ते पाच महिन्यांच्या अंतराने दिले जाते.
सध्या एप्रिलपासूनचे मानधन कंपनीकडे थकीत आहे. तथापि मानधनासाठी चौदाव्या वित्त आयोगातून राखीव असलेली रक्कम कंपनीकडे जमा झाली आहे. मात्र अद्याप मानधन अदा करण्यात आले नाही. त्यामुळे संगणक परिचालक संपावर गेले आहे.
आयटी विभागात नियुक्ती द्यावी
संगणक परिचालकांना शासनाच्या आयटी विभागात नियुक्ती द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आश्वासन दिले होते. मात्र आठ महिने लोटूनही अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या संयमाचा बांध फुटत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती देऊन न्याय द्यावा. अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत ग्रामपंचायतींचे सर्व कामकाज बंद राहील, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण बरडे, सचिव शरद पवार, उपाध्यक्ष अश्विन देशमुख व तालुक्यातील संगणक परिचालकांनी दिला.

Web Title: 19 Gram Panchayat Offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.