आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मानवत तालुक्यातील मानोली येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून चार ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात विषारी द्रव्य प्राशन करून सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
यवतमाळ जिल्ह्यात शंकर चायरे यांनी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरुन आणि माधव रावते यांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. कोट्यवधींची कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, हेच या दोन आत्महत्यांनी सिद्ध केले. ...
मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील माधवराव शंकरराव रावते (७५) या शेतक-याने कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने स्वत:च्या शेतात सरण रचून जाळून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी घडलेल्या या घटनेला सोमवारी वाचा फुटली. ...
आर्थिक विवंचनेत असलेल्या एका शेतकऱ्याने भररस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथे रविवारी रात्री घडली. ...
यवतमाळ जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने राजकीय व्यवस्थेला हादरे बसले. मृत शेतकऱ्याच्या मुलीने पंतप्रधानांचा निषेध करीत थेट राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठविले. ...