धक्कादायक ; वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 04:33 PM2018-04-17T16:33:05+5:302018-04-17T16:33:05+5:30

यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २९० शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला.

Shocking Farmer suicides every eight hours in Verhad | धक्कादायक ; वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या

धक्कादायक ; वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या

Next
ठळक मुद्दे शंभर दिवसांत २९० शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सलग दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षणाचा खर्च या विवंचनेत जगाचा पोशिंदा मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २९० शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे व दरवर्षी कजार्चा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ९८९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ६ हजार ७१८ प्रकरणे पात्र, ८ हजार ११९ अपात्र तर १५२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा २९० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, यामध्ये जानेवारी महिन्यात ९७ फेब्रुवारी ८२, मार्च ९२, तर १० एप्रिलपर्यंत १९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.
महसूल विभागाच्या निरीक्षण नोंदीनुसार सर्वाधिक ४५ टक्के आत्महत्या ह्या ३० ते ४० या वयोगटातील तरूण शेतकऱ्यांच्या आहेत. यामध्येही सर्वाधिक प्रमाण अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांचे आहे. यात दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शासनाच्या उपाय तोकडे ठरत असल्याने शेतकरी आत्महत्यामुक्त होण्यासाठी वरवरची मलमपट्टी नव्हे, तर दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे.

२००१ पासून १४,९८९ शेतकरी आत्महत्या
विभागात १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १४ हजार ९८९ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये २०१७ मध्ये सर्वाधिक १,१७६, सन २०१६ मध्ये १,२३५,सन २०१५ मध्ये १,३४८, सन २०१४ मध्ये ९६४, सन २०१३ मध्ये ८०५, सन २०१२ मध्ये े९५१, सन २०११ मध्ये ९९९, सन २,०१० मध्ये १,१७७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

कर्जमाफीच्या ३१५ दिवसांत ९५२ आत्महत्या
जून २०१७ मध्ये शासनाने कर्जमाफी जाहीर केली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच ३१५ दिवसांत ९५२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. किंबहुना या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये जून महिन्यात ८२, जुलै ८९, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२१, आॅक्टोबर ९६, नोव्हेंबर ८८, डिसेंबर ६५, जानेवारी २०१८ मध्ये, ९७, फेब्रुवारी ८२, मार्च ९२ व १० एप्रिलपर्यंत १९ शेतकरी आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.

Web Title: Shocking Farmer suicides every eight hours in Verhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.