माळशेज घाटात भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:23 IST2026-05-05T15:22:25+5:302026-05-05T15:23:48+5:30
Accident at Malshej Ghat: माळशेज घाटात एसटी आणि स्कॉर्पियो यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

माळशेज घाटात भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू
माळशेज घाटात एसटी आणि स्कॉर्पियो यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. वळणावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कल्याणवरून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या बसला स्कॉर्पियोने समोरून धडक दिली. वळणावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात ४ जणांचा मृत्यू झाला तर इतर चार जण हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, अपघाताचं वृत्त समजल्यानंतर महामार्ग पोलीस आणि स्थानिक यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाली आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तसेच अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.