धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
या मोहिमेत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा उडी घेतली असून त्यांनी बीड येथे काल अंबाजोगाई ते अहमदपूर राज्य रस्ता क्र.156 खड्ड्यांसोबत सेल्फी काढून ते फोटो ट्विटरवर मंत्री पाटील यांना पाठवले आहेत. ...
मराठवाड्यातील प्रश्नांसाठी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे सरकार नुसते आश्वासन देत आहे. तुम्हाला या भागाशी आस्था आहे की नाही, असा सवाल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला आहे. ...
शेतकरी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सरकारविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी दुपारी विराट मोर्चा काढण्यात आला. ...
सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या तीनपैकी एका अभियंत्याचे ‘राजकीय कनेक्शन’ उघड झाले असून तक्रार मागे घेण्यासाठी संबधितांच्या निकटवर्तीयांकडून धमकी देण्यात आल्याचे ठेकेदाराने सांगितले. ...