धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
शहीद जवानांच्या नावावर मत मागतात. मात्र आज अकलूज मध्ये जवानांच्या पत्नीबद्दल अपशब्द काढणारे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार स्वीकार करतात असा टोला ही धनंजय मुंडे यांनी लगावला. ...
मोठ्यांची लेक असल्यामुळे तुम्ही वाघिण झाल्या आणि शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून बजरंग हा गुलेर झाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना हा शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान नाही, का असा सवाल धनंजय मुंडेंनी केला. ...
दरम्यान पंकजा मुंडे यांनी पवार कुटुंबियांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या दाव्याला फाटा देत पंकजा यांनी पवार कुटुंबियांना घट्ट राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पवार कुटुंबाचे विभाजन होऊ नये, यासाठी प्रार्थना केली. ...
भाजपने ५ वर्षांपूर्वी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. ५ वर्षांत शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. शेतकºयांचे समूळ नष्ट करण्याचे काम केंद्र व राज्यातील सरकार करत आहे. ...
या लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघेही परळी विधानसभा मतदार संघावर आपले प्राबल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. ...
शरद पवारांच्या कुटंबात पक्षाच्या श्रेय वरून वाद सुरु असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केली होती. मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देत धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणातून मोदेंची खिल्ली उडवली आहे. ...