The satire of Modi's movement is even more intense than the drought: Dhananjay Mundhe | मोदींच्या कारभाराचे बसलेले चटके दुष्काळापेक्षाही अधिक तीव्र : धनंजय मुंढे
मोदींच्या कारभाराचे बसलेले चटके दुष्काळापेक्षाही अधिक तीव्र : धनंजय मुंढे

ठळक मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सभाकेंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला - धनंजय मुंढेभाजपने ५ वर्षांपूर्वी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत - धनंजय मुंढे

बार्शी : मोदींनी १५ लाखांच्या नावाने जनतेला फसविले. दरवर्षी दोन कोटी नोकºयांचे आश्वासन दिले. भाजपने ५ वर्षांपूर्वी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. ५ वर्षांत शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. शेतकºयांचे समूळ नष्ट करण्याचे काम केंद्र व राज्यातील सरकार करत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांना आता पराभव दिसू लागल्यानेच सरकारविरोधात महागठबंधन तयार करणाºया शरद पवार यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केले.

 राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. बार्शीतील जुन्या गांधी पुतळ्याजवळ ही सभा झाली. 

मुंढे म्हणाले, राज्याला दुष्काळाचे चटके बसताहेत, परंतु मोदींच्या कारभाराचे बसलेले चटके दुष्काळापेक्षाही अधिक तीव्र आहेत याची जाणीव सभेला झालेली गर्दी पाहून होत आहे. मोदी हे नोटबंदी, जीएसटीचे फायदे सांगत नाहीत. मुद्रा योजना, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, त्यांच्या काळात झालेला दहशतवादी हल्ला यावर काही बोलत नाहीत.

सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून ते शहिदांच्या नावे मते मागत आहेत. यापूर्वीच्या सरकारांच्या काळातही युद्धं झाली परंतु त्यांनी कधीच याचे राजकीय भांडवल करून मते मागितली नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली. ज्यांनी शहा यांना अफजलखान म्हटले,  त्यांनीच गुजरातमध्ये अफजलखानाच्या शामियान्यात जाऊन त्यांना मुजरा केला अशी टीका त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी आर्यन सोपल, नागेश अक्कलकोटे, विक्रम सावळे,अब्बास शेख आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. 


Web Title: The satire of Modi's movement is even more intense than the drought: Dhananjay Mundhe
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.