देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याऐवजी शासनाने त्यांच्या हातात केराची टोपली थोपविण्याचे काम केले आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांचे भवितव्य अंधारात आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले. ...
सरकारी फाइल्सवरील मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या सह्या बोगस असल्याचा तसेच त्यांचे कोणीतरी नातेवाईक किंवा अधिकारी सह्या करीत असावेत, असा संशय काँग्रेसने व्यक्त केला आहे. ...