देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आधीच म्हटले केले होते की, दिग्विजय सिंह यांनी इंदौर किंवा भोपाळ सारख्या आव्हानात्मक मतदार संघातून निवडणूक लढवावी. ...
मोदींचा माझ्यावरील क्रोध फक्त त्यांच्या स्वत:ची असुरक्षिततेची आणि भीतीची भावना असल्यामुळे आहे असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे ...
औरंगाबाद येथून सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारले आहे ...